Home /News /videsh /

कोरोनाग्रस्त रुग्णासोबत काढलेला सेल्फी नडला, 6 सरकारी अधिकारी निलंबित

कोरोनाग्रस्त रुग्णासोबत काढलेला सेल्फी नडला, 6 सरकारी अधिकारी निलंबित

कोरोनाग्रस्त रुग्णासोबत काढलेला सेल्फी नडला, 6 सरकारी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

    कराची, 24 मार्च : जगभरात थैमान घालत असलेला कोरोना पाकिस्तानमध्येही झपाट्याने पसरत आहे. चिंताजनक बाब म्हणजे, पाकमध्ये सोयी सुविधा नसल्यामुळे या आजाराची लक्षणे उशीरा दिसून येत आहेत. याचा परिणाम कराचीमधली अधिकाऱ्यांना सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत सेल्फी काढला होता, मात्र त्यानंतर हा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत आढळून आले. हा सेल्फी समोर आल्यानंतर या सर्वांना निलंबित करण्यात आले होते. मित्रासोबत काढला होता सेल्फी पाक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकमधील खैरपूर जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मित्रासोबत सेल्फी वाढला होता. मात्र कोरोना चाचणीत हा मित्र पॉझिटिव्ह आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना पीडित नुकताच इराणमधून परतला होता. अहवालात असे म्हटले आहे की ते सर्वजण धार्मिक स्थळाला भेट देऊन आलेल्या मित्राला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी या व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मात्र काही दिवसांनी चाचणी केल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे समोर आले. यानंतर जेव्हा या अधिकाऱ्यांचा सेल्फी व्हायरल झाला त्यानंतर या सर्वांना निलंबित करण्यात आले. सध्या या अधिकाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. वाचा-कोरोना म्हणजे जोक वाटला का, रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांची पाहा काय अवस्था झाली पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 6हून अधिक जणांचा मृत्यू पाकमध्ये सोमवारी दक्षिण-पूर्व प्रांत बलुचिस्तानमध्ये कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला. यासह, COVID-19च्या संसर्गाने झालेल्या मृतांचा आकडा आतापर्यंत 6वर पोहोचला आहे, तर एकूण 303 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सिंधमध्ये कोरोनाचे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि आता कोरोना बळी पडलेल्यांची संख्या 352 झाली आहे. सिंधमधील 11 घटनांपैकी 7 घटना राजधानी कराचीमधील आहेत. पंजाबमधील सिंधबाहेरची सर्वात वाईट परिस्थिती आहे. 225 लोक येथे सकारात्मक आढळले आहेत. वाचा-VIDEO: 5 वर्षांच्या लेकीला कोरोनापासून वाचवण्यासाठी क्रिकेटपटूची धडपड
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या