मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जेलमध्ये असलेल्या भावाच्या खुन्याला 'तिने' लिहिलं पत्र; त्यातूनच वाढलं प्रेम आणि...

जेलमध्ये असलेल्या भावाच्या खुन्याला 'तिने' लिहिलं पत्र; त्यातूनच वाढलं प्रेम आणि...

भावाच्या खुनाबद्दल शिक्षा भोगत असलेल्या माणसाबरोबरच बहिणीचं प्रेम जमलं... तेही पत्रातून.

भावाच्या खुनाबद्दल शिक्षा भोगत असलेल्या माणसाबरोबरच बहिणीचं प्रेम जमलं... तेही पत्रातून.

भावाच्या खुनाबद्दल शिक्षा भोगत असलेल्या माणसाबरोबरच बहिणीचं प्रेम जमलं... तेही पत्रातून.

न्यूयॉर्क, 21 ऑगस्ट: 57 वर्षांचा जॉन टिडजेन (John Tidgen) आणि क्रिस्टल स्ट्रॉस (Crystal Strauss) नावाची महिला यांचा अमेरिकेत नुकताच विवाह झाला. आता तुम्ही म्हणाल, की ही काय बातमी आहे का? पण यातली खरी बातमी पुढेच आहे. क्रिस्टल स्ट्रॉस या महिलेच्या सावत्र भावाचा खून जॉन टिडजेन याने केला होता. तो गुन्हा सिद्ध झाला होता आणि त्याबद्दल त्याला तब्बल 32 वर्षांचा तुरुंगवासही झाला. ती शिक्षा भोगून तो बाहेर आल्यानंतर आता त्या दोघांनी लग्न केलं आहे. सर्वांत विचित्र गोष्ट म्हणजे तो तुरुंगात (Prison) असताना त्यांच्यादरम्यानच्या पत्रव्यवहारातून त्यांच्यातलं प्रेम खुललं. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि त्या निभावल्याही. विचित्र वाटत असलं, तरीही ही खरी घटना आहे. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आपल्या सावत्र भावाच्या (Step Brother) खुन्याशी लग्न करणाऱ्या क्रिस्टलशी 'न्यूज 5'ने संपर्क साधला आणि त्यांच्यातल्या प्रेमसंबंधांबद्दल विचारलं. तेव्हा क्रिस्टलने सांगितलं, 'माझं त्याच्यावर प्रेम आहे, हे उघडच आहे. कारण प्रेम नसतं, तर मी त्याच्याशी लग्न कशाला केलं असतं?' जॉननेही तसंच सांगितलं. 'माझंही क्रिस्टलवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही,' असं तो म्हणाला. अमेरिकेतल्या कुयाहोगा काउंटीमध्ये घडलेली ही घटना आहे. 'मिरर'च्या वृत्तानुसार, 1989 साली क्रिस्टलचा सावत्र भाऊ ब्रायन मॅकगरी त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडला होता. त्याच्या हत्येचा आरोप जॉनवर होता. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतरच्या चौकशीत सुरुवातीला त्याने सांगितलं, की ब्रायनने आत्महत्या केली आहे; मात्र नंतर जॉनने कबूल केलं, की स्वसंरक्षणासाठी त्याने ब्रायनला ठार मारलं आहे. रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब,CCTV पाहिला तर धक्का बसला ब्रायनच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा सापडल्या. तसंच, त्याला गोळीही लागली होती. आपण ब्रायनला गोळी मारल्याचं जॉनने सांगितलं; मात्र त्याचे कोणतेच पुरावे सापडले नाहीत. जॉनच्या हातावर गन पावडर सापडली नाही किंवा रक्ताचे डागही आढळले नाहीत; मात्र रायफलच्या बॅरलवर ब्रायनच्या रक्ताचे डाग आढळले होते. त्यावरून असं स्पष्ट झालं, की त्याला फार जवळून गोळी झाडण्यात आली होती. कुयाहोगा काउंटी कोर्टाने एप्रिल 1989मध्ये जॉनला या प्रकरणी दोषी ठरवलं आणि 32 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सहाव्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होते माजी मंत्री; पत्नीनेच घडवली तुरुंगवारी आपल्या सावत्र भावाला जॉनने नेमकं का मारलं, हे जाणून घेण्यासाठी त्याची बहीण क्रिस्टल स्ट्रॉस याने त्याला तुरुंगात पत्र पाठवलं होतं. जॉनचे वकील किम्बर्ली कोरल यांनी त्याच्यापर्यंत हे पत्र पोहोचवलं. या माध्यमातून सुरू झालेला पत्रांचा सिलसिला नंतर कायम राहिला आणि जॉन व क्रिस्टल एकमेकांच्या प्रेमात (Love) पडले. त्यानंतर जॉन शिक्षा संपवून कधी बाहेर येईल, याची क्रिस्टल वाट पाहत होती. त्यामुळेच तो शिक्षा संपवून बाहेर आल्यावर त्या दोघांनी भूतकाळाच्या कटू आठवणी पुसून टाकून नवं आयुष्य सुरू केलं आहे.
First published:

Tags: Love story

पुढील बातम्या