मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

VIDEO - कारमध्ये अडकलेल्या महिलेसाठी धावली पब्लिक; सर्वांच्या डोळ्यादेखत क्षणात गायब झाली

VIDEO - कारमध्ये अडकलेल्या महिलेसाठी धावली पब्लिक; सर्वांच्या डोळ्यादेखत क्षणात गायब झाली

कारसह महिला अचानक जमिनीत सामावू लागली. (प्रतीकात्मक फोटो)

कारसह महिला अचानक जमिनीत सामावू लागली. (प्रतीकात्मक फोटो)

कार आणि महिला नागरिकांच्या डोळ्यादेखत जमिनीत सामावत होते. वाचवण्यासाठी नागरिकांनी शेवटपर्यंत धडपड केली.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 12 ऑगस्ट :  अपघात असो किंवा एखादी दुर्घटना... समोर एखाद्याचा जीव जाताना दिसताच काही लोक मदतीसाठी तत्परतेने धावून जातात. काही जण तर आपल्या जीवाचीही लावतात. अशीच एक महिला कारमध्ये अडकली होती. तिला वाचवण्यासाठी लोक धावून आले आणि काही क्षणातच त्यांच्या डोळ्यादेखत ती गाडी अचानक गायब झाली. अमेरिकेत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. टेक्सासमध्ये राहणारी ही महिला. एल पासो या शहरात होती. तिथं तिनं एका ठिकाणी कार पार्क केली. पण ही कार अचानक जमिनीत सामावू लागली. कारण महिलेने जिथं ही कार पार्क केली तिथं पाणी होतं. रस्त्यावर असंच पाणी साचलं असेल असं या महिलेला वाटलं, म्हणून तिनं तिथं गाडी पार्क केली. पण ते फक्त पाणी नव्हतं, खरंतर तो सिंकहोल होता. महिलेने पाण्याने भरलेल्या सिंकहोलमध्येच कार उभी केली. गाडी उभी करताच ती अचानक पाण्यात बुडू लागली. हे वाचा - VIDEO - भरधाव बसला येताना पाहून जीव वाचवण्यासाठी धडपडले पण...; गाडीने अख्ख्या कुटुंबाला उडवलं सुदैवाने तिथं असलेल्या नागरिकांचं लक्ष त्या जमिनीत सामावणाऱ्या गाडीकडे गेलं. त्या गाडीत असलेल्या महिलेला त्यांनी पाहिलं आणि कारसह त्या महिलेला वाचवण्यासाठी म्हणून नागरिकांनी धाव घेतली. तिला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. तात्काळ अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. कार पाण्यात बुडत जात होती. कार आणि महिलेला वाचवणं काही शक्य होत नव्हतं. कारला पाण्याबाहेर काढणं शक्य नसल्याचं समजलं. शेवटी कारऐवजी त्या महिलेला कारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर कसबसं करून त्या महिलेला बाहेर काढण्यात यश मिळालं. कारच्या रिअर विंडशील्डमधून तिला खेचून बाहेर काढलं. हे वाचा - Shocking! आकाशातून थेट माणसाच्या डोक्यावर; विमानाच्या खतरनाक लँडिंगचा VIDEO VIRAL जशी महिला कारबाहेर आली तशी कार काही क्षणातच पाण्यात बुडाली. सर्वांच्या डोळ्यादेखत ती गायब झाली. ही संपूर्ण घटना इसे एल पासोच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. KTVE 10 KARD 14 myarklamiss फेसबुक अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
First published:

Tags: Accident, Viral, Viral videos, World news

पुढील बातम्या