Home /News /videsh /

अखेर आली कोरोनाची एक्सपायरी डेट, सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी सांगितली तारीख

अखेर आली कोरोनाची एक्सपायरी डेट, सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी सांगितली तारीख

'या' तारखेला जगातून कायमचा नष्ट होणार कोरोना, सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी दिले संकेत.

    लंडन, 24 मे : जगभरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 53 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 3 लाख 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनावर लस आणि औषधं शोधण्यासाठी दिवसरात्र शास्त्रज्ञ मेहनत करत असताना अखेर सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी कोरोना कधी नष्ट होणार याबाबत संकेत दिले आहेत. सिंगापूरच्या काही शास्त्रज्ञांनी जगभरातील काही देशांबाबत भाकित केलं आहे. यावरून 30 सप्टेंबरपर्यंत ब्रिटनमधून कोरोनाचा सर्वनाश होणार असल्याचं सांगितलं आहे. सिंगापूर यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइनच्या (SUTD) शास्त्रज्ञांनी आपल्या एका अभ्यासात काही तारखा जाहीर केल्या आहेत. यात पुढील 4 महिन्यात ब्रिटनमधून कोरोनाचा सर्वनाश होऊ शकतो अशी माहिती दिली आहे. शास्त्रज्ञांनी 7 मे रोजी या तारखांबाबत माहिती दिली होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळं जवळजवळ 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. वाचा-मुंबईतून धक्कादायक बातमी, शवगृहातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण इटली, अमेरिका आणि सिंगापूरबाबत केली भविष्यवाणी यानंतर शास्त्रज्ञांनी इतर काही देशांमध्येही व्हायरसचा संसर्ग पूर्णपणे संपुष्टात येईल. 8 मे रोजी इतर काही देशांबाबत शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला. यानुसार 24 ऑक्टोबरपर्यंत इटलीमध्ये कोरोना विषाणूचा पूर्णपणे नाश होईल, असा शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. तर, 11 नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेत व्हायरसचा अंत होईल. त्याचप्रमाणे सिंगापूरमध्ये 27 ऑक्टोबरपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपेल. या भविष्यवाणीनंतरही शास्त्रज्ञांनी लोकांना कोरोना विषयक काळजी घेण्यास सांगितलं आहे.  द सनच्या एका वृत्तानुसार, सेंटर फॉर एविडेंस बेस्ड मेडिसीनच्या प्राध्यापकाने असं म्हटले आहे की जर संक्रमण आणि मृत्यूचा हा दर कायम राहिला तर जून अखेरीस या आजारामुळं मृतांची संख्या कमी होईल. वाचा-कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी औषधांपेक्षाही चहा प्रभावी; तज्ज्ञांचा दावा थायलंडमध्ये कोरोनाची लस दुसऱ्या टप्प्यात थायलंडमधून कोरोना लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. थायलंडमध्ये कोरोना लसीची तयारी झाली असून प्राण्यांवर याचा ट्रायल करण्यात येणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडच्या या लसीला प्रारंभिक यश मिळालं आहे आणि उंदरांवर चांगला परिणाम दिसत आहे. आता माकडांवर या लसीची चाचणी सुरू झाली आहे. थायलंडनेही असं म्हटलं आहे की सहा ते सात महिन्यांत कोरोनाची लस तयार केली जाऊ शकते. थायलंडचे उच्च शिक्षण, विज्ञान, संशोधनमंत्री सुवात मेसेन्से म्हणाले की, उंदरांवर चाचणी घेतल्यानंतर संशोधक लस तपासणीच्या पुढील टप्प्यात जात आहेत. ते म्हणाले की सप्टेंबरपर्यंत तीन डोसवर काम केलं जात असून सप्टेंबरमध्ये स्पष्ट निकाल अपेक्षित आहे. असा असेल लॉकडाऊननंतरचा प्रवास
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या