Home /News /videsh /

सुपरवायझरसह SEX करताना पत्नीचे फोटो केले शेअर, पतीला 13 आठवड्यांचा कारावास

सुपरवायझरसह SEX करताना पत्नीचे फोटो केले शेअर, पतीला 13 आठवड्यांचा कारावास

एका 27 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचे आणि तिच्या सुपरवायझरचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्या व्यक्तीला 13 आठवड्यांची कैद सुनावली आहे.

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : एका 27 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचे आणि तिच्या सुपरवायझरचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो फेसबुकवर अपलोड (Man Uploads intimate pics of wife and Supervisor) केले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्या व्यक्तीला 13 आठवड्यांची कैद सुनावली आहे. 3 डिसेंबरला याबाबतचा निकाल देण्यात आला. या व्यक्तीने फेसबुकवर केलेल्या पोस्टला काही तासांमध्येच हजारो शेअर्स (Singapore man viral FB post) मिळाले होते. नेमकं काय आहे प्रकरण? सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका पतीने पत्नीचं बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे, याचा संशय असल्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. या वादामुळेच 2019 च्या डिसेंबरमध्ये हा नवरा आपल्या पत्नीचं घर सोडून निघून गेला. त्यानंतर गेल्या वर्षी 6 फेब्रुवारीला या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या घरी जात, तिच्या हातातून तिचा फोन पळवून नेला. आपल्या संशयाची खात्री करण्यासाठी पतीने आपल्या पत्नीचा फोन तपासला. त्यात तिचे निर्वस्त्र अवस्थेतील व्हिडीओ (Man finds naked videos of wife) होते. तसंच, तिचे तिच्या सुपरवायझरसोबत सेक्स करतानाचे फोटोही (Man finds pics of Wife having sex with her supervisor) या फोनमध्ये होते. या व्यक्तीने आपल्या पत्नीचे ते फोटो, व्हिडीओ तसंच तिचे आणि सुपरवायझरचे मेसेजेसही आपल्या फोनमध्ये सेव्ह करून घेतले. यानंतर त्याने गुपचूप पत्नीचा फोन तिला परत दिला.

बॉयफ्रेंडला बोलावलं घरी, गर्लफ्रेंडच्या आईला पाहून बसला धक्का

फेसबुकवर अपलोड केले पत्नीचे आक्षेपार्ह फोटो - यानंतर 12 फेब्रुवारीला त्याने आपली पत्नी आणि सुपरवायझरचे फोटो फेसबुकवर अपलोड (Pictures of wife having sex with supervisor uploaded on FB) केले. याच्या कॅप्शनमध्ये त्याने सुपरवायझरचं नाव, कामाचं ठिकाण याबाबत सर्व माहिती दिली होती. तसंच, त्याने पत्नी आणि सुपरवायझरमध्ये झालेल्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्सही अपलोड केले होते. यात त्या सुपरवायझरला त्याने “लोकांची घरं तोडणारा” असं म्हटलं आहे. तसंच, इतरांना त्यापासून सावध राहण्याचा इशाराही दिला होता. या व्यक्तीने सकाळी 8 वाजता अपलोड केलेल्या या पोस्टला सायंकाळी चार वाजेपर्यंतच 3,000 लाईक्स, 2,000 शेअर्स आणि 1,000 कमेंट्स मिळाल्या होता. आपल्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहून त्या व्यक्तीने ही पोस्ट डिलीट केली. मात्र नंतर, आपल्या पत्नीचा चेहरा ब्लर करून पुन्हा हे फोटो अपलोड केले. यामध्ये सुपरवायझरचा चेहरा मात्र ब्लर करण्यात आला नव्हता.

OMG! World Record साठी तरुणीचे एकाच दिवसात 900 पुरुषांसोबत संबंध

“आपल्यावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये, आणि त्या सुपरवायझरपासून लोकांना सावध करण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची माहिती आरोपीने दिली आहे. यामुळे आपल्या पत्नीवर अपमानित होण्याची वेळ येईल, याची त्याला जाणीव होती.” असं म्हणत डेप्युटी पब्लिक प्रॉसिक्युटर फूंग के हुई यांनी आरोपीला 18 महिन्यांची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. “आरोपीने हे कृत्य पत्नीकडून झालेल्या विश्वासघातामुळे, आणि रागातून केलं आहे. त्या सुपरवायझरनेही आपलं कृत्य मोबाईमध्ये रेकॉर्ड केलं होतं. त्याला आपण चुकीचं करत असल्याचा पश्चाताप नाही, तर अभिमान होता. अशा लोकांचा बचाव करण्याचं काम या खटल्याद्वारे होत आहे.” असा युक्तिवाद आरोपीच्या वकीलांनी केला. अशा प्रकारच्या इतर खटल्यांचा दाखला देत सरकारी वकिलांनी जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली. मात्र, “दाखला देण्यात आलेली इतर प्रकरणं ही अतिशय गंभीर प्रकारातील आहेत. त्यातील काही प्रकरणांमध्ये असे आक्षेपार्ह व्हिडीओ पॉर्नोग्राफिक साईट्सवर अपलोड करण्यात आले होते. हे प्रकरण त्या तुलनेने कमी गंभीर आहे” असं म्हणत न्यायाधीश केल्सर सोह यांनी फोटो अपलोड करणाऱ्या पतीला 18 महिन्यांऐवजी 13 आठवड्यांची शिक्षा सुनावली.
First published:

Tags: Court, Facebook

पुढील बातम्या