Home /News /videsh /

CORONA EFFECT: विमान उडवताना पायलटकडून होतायत चुका, वाढतेय प्रवाशांची चिंता

CORONA EFFECT: विमान उडवताना पायलटकडून होतायत चुका, वाढतेय प्रवाशांची चिंता

कोरोनामुळे वैमानिकांच्या कौशल्यावर परिणाम होत असून विमान उडवताना त्यांच्याकडून अक्षम्य (Silly mistakes by air pilots after corona) चुका होत असल्याचं समोर येत आहे.

    वॉशिंग्टन, 15 ऑक्टोबर : कोरोनामुळे वैमानिकांच्या कौशल्यावर परिणाम होत असून विमान उडवताना त्यांच्याकडून अक्षम्य (Silly mistakes by air pilots after corona) चुका होत असल्याचं समोर येत आहे. काही वैमानिक तर अशा चुका करत आहेत, ज्या (Fatal silly mistakes by pilot) प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात. यापूर्वी उत्तम पायलट म्हणून काम केलेल्या वैमानिकांच्या बाबतीतही असेच अनुभव आहेत. चुका करणाऱ्या बहुतांश वैमानिकांना कोरोना होऊन गेल्याचं (Post corona impact) दिसून आलं आहे. त्यामुळे हा कोरोनाचा परिणाम आहे की सेवेत खंड पडल्यामुळे सराव कमी झाला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा होतायत चुका अमेरिकेतील विमान प्रवासाच्या अनुभवाबाबत ब्लूमबर्गनं दिलेल्या बातमीनुसार एक पायलट विमानाचं उड्डाण करताना दुसरं इंजिन सुरू करायलाच विसरला. सुदैवानं पायलटनं हे टेकऑफ रद्द केलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. कोरोना काळात हा पायलट 7 महिने सेवेतून बाहेर होता आणि त्याला कोरोनाचीही लागण होऊन गेली होती. दुसऱ्या एका घटनेत पायलट विमानाचं लँडिंग करताना चाकं उघडायचंच विसरून गेला. आयत्या वेळी त्याच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यानं लँडिंग पुढे ढकलून वेळ ऍडजस्ट केली आणि सेफ लँडिंग केलं.  तर आणखी एका घटनेत एका बिझी एअरपोर्टवर पायलट विमान चुकीच्या दिशेला घेऊन गेला. हे विमान चालवणारा पायलट गेल्या सहा महिन्यांपासून घरी होता आणि त्याला नुकताच कोरोना होऊन गेला होता. हे वाचा - निर्दय! पती आणि पत्नी झाले कोरोना पॉझिटीव्ह, सरकारने मारले 12 पाळीव कुत्र कोरोनाचा परिणाम की गॅपचा? या घटनांना कोरोनाच जबाबदार असल्याचं विमानातील क्रू मेबर्सचं म्हणणं आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यामुळे वैमानिकांचा सराव राहिला नसल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेकदा छोट्या मोठ्या ‘सिली मिस्टेक्स’ वैमानिकांकडून होत असल्याचं दिसून येत आहे. वैमानिकांसाठी ट्रेनिंग सेशन्स सेवेत खंड पडल्यामुळे वैमानिकांना पुन्हा एकदा सर्व गोष्टींची उजळणी करून देण्यासाठी ट्रेनिंग सेशन्स घेतली जात आहेत. ट्रेनिंग सेशन्समध्ये अनेक वैमानिक चांगली कामगिरी करतात, मात्र प्रत्यक्ष उड्डाणावेळी येणारा मानसिक दबाव हा वेगळाच असल्याचा अनुभवही शेअर करतात. मात्र वैमानिकांच्या चुका दिसू लागल्यानंतर विविध विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग सुरू केलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Airplane, America, Corona

    पुढील बातम्या