होणाऱ्या पत्नीनेच दिली 7 लाखांची सुपारी, पाकमधील शीख युवकाच्या हत्येचा धक्कादायक खुलासा

होणाऱ्या पत्नीनेच दिली 7 लाखांची सुपारी, पाकमधील शीख युवकाच्या हत्येचा धक्कादायक खुलासा

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या (Pakistan) पेशावरमध्ये (Peshawar) एका शीख युवकाची हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 10 जानेवारी : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या (Pakistan) पेशावरमध्ये (Peshawar) एका शीख युवकाची हत्या करण्यात आली आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांविरूद्ध होत असलेले अत्याचारांवर पुन्हा एकदा जगभरात चर्चा झाल्या होत्या. मात्र आता या हत्येप्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियात राहणारा रवींद्र सिंग लग्नासाठी पाकिस्तानात आला होता. त्याचा विवाह प्रेम कुमारी या त्याच्या प्रियसीशी होणार होता. मात्र प्रेम कुमारीला रवींद्र सिंगसोबत लग्न करायचे नसल्यामुळं तिने रवींद्रला ठार मारण्यासाठी तब्बल 7 लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर खैबर पख्तुनवा प्रांतातील मर्दान येथील शॉपिंग मॉलमध्ये रवींद्रला एका शूटरने गोळ्या घालून ठार केले. रवींद्रसिंग यांचा मृतदेह पेशावर येथे पाठवण्यात आला होता.

वाचा-'विशिष्ट धर्माला लक्ष्य करणं अयोग्य' : साहित्य संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो

पाकिस्तानी पत्रकार हरमीत सिंगचा यांचा भाऊ असलेल्या रवींद्र हा पख्तुनवा प्रांतातील शांगलाचा रहिवासी होता. तो मलेशियात राहत होता आणि आपल्या लग्नासाठी घरी आला होता. जेव्हा त्याचा खून झाला तेव्हा तो मॉलमध्ये आपल्या लग्नासाठी खरेदी करण्यासाठी गेला.

वाचा-मांजरीला वाचवण्यासाठी आज्जीने नातवाला 5व्या मजल्यावर लटकवलं, पाहा Shocking Video

दरम्यान या शीख युवकाच्या हत्येनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध करत पाकिस्तानला असे सांगितले की अल्पसंख्याकांविरूद्ध अशा भयंकर घटना रोखण्यासाठी कडक पावले उचलली पाहिजेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की पाकिस्तानने इतर देशांना प्रचार करण्याऐवजी अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी काम केले पाहिजे. तसेच, या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या दोषींवर कारवाई केली जावी आणि त्यांना शिक्षा केली जावी यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाचा-वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली आली अंत्ययात्रेत, VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू

गुरुद्वारावर केला होता दगडफेक

यापूर्वी पाकिस्तानमध्ये लोकांच्या जमावाने गुरुद्वारावर हल्ला केला आणि शीख भाविकांवर दगडफेक केली होती. यानंतर एका शीख किशोरवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीच्या कुटूंबाच्या नातेवाईकांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी गुरुद्वारा जन्मस्थानक ननकाना साहिब बाहेर निदर्शने केली. गुरुद्वारा ननकाना साहिब लाहोरजवळ आहे ज्याला गुरुद्वारा जन्मस्थान म्हणून देखील ओळखले जाते. हे शीखांचे पहिले गुरु नानक देव यांचे जन्मस्थान आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2020 03:46 PM IST

ताज्या बातम्या