पैगंबरांचा अपमान केला म्हणून बँक मॅनेजरला घातल्या गोळ्या; मारेकऱ्याच्या स्वागत मिरवणुकीचा VIDEO VIRAL

पैगंबरांचा अपमान केला म्हणून बँक मॅनेजरला घातल्या गोळ्या; मारेकऱ्याच्या स्वागत मिरवणुकीचा VIDEO VIRAL

भररस्तातून मारेकऱ्याची मिरवणूक काढण्यात आली. लोक त्याची गळाभेट घेत होते.

  • Share this:

इस्लामाबाद, 5 नोव्हेंबर : पाकिस्तानाच्या (Pakistan Bank Manager murder) पूर्व पंजाब प्रांतातील एका बँक मॅनेजरची हत्या करण्यात आली. त्याच्यावर पैगंबराचा अपमान करण्याचा आरोप आहे. या बँक मॅनेजरची हत्या तेथील एका सुरक्षा रक्षकाने केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनेजरने पैंगबर मोहम्मदाचा अपमान केला होता. ज्यानंतर गार्डने त्याला गोळ्या घातल्या. अहमद नवाज नावाच्या गार्डाला जेव्हा ताब्यात घेतले जात होते तेव्हा तो पैगंबराच्या नावाने घोषणा देत होत्या. यानंतर तेथील स्थानिक जमा झाले आणि त्यानंतर त्याचा स्वागत-सत्कार सुरू झाला. अहमद तुरुंगाच्या इमारतीच्या शतावर उभा राहून आनंदात नाचत होता. पाकिस्तान सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये लोक मारेकऱ्याला गळाभेट घेत आहेत..काहीजण त्याच्यासोबत फोटो काढत आहेत. सर्वजण त्याचं कौतुक करीत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारेकऱ्याची मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Published by: Meenal Gangurde
First published: November 5, 2020, 6:29 PM IST

ताज्या बातम्या