'Dirty अरब' म्हणत मुस्लिम 2 महिलांवर चाकूहल्ला! क्षुल्लक कारणावरून केले 6 वार

'Dirty अरब' म्हणत मुस्लिम 2 महिलांवर चाकूहल्ला! क्षुल्लक कारणावरून केले 6 वार

हल्लेखोरांनी त्या महिलांना 'Dirty अरब' म्हणत हिणवले होते. जखमी महिला मूळच्या अल्जेरियन आहेत.

  • Share this:

पॅरिस, 22 ऑक्टोबर: फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिसमध्ये (Paris Attack) धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुस्लिम महिलांवर (Muslim Women) चाकूहल्ला झाल्याची घटना आयफेल टॉवरजवळ (Eiffel Tower) घडल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेमुळे शहरात थरकाप उडाला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर शिकवताना एका 47 वर्षीय शिक्षकाने चार्ली हेबो मासिकात छापून आलेले प्रेषित मोहम्मद यांचे अर्कचित्र विद्यार्थ्यांना दाखवले होते. सॅम्युअल पॅटी असं या शिक्षकाचं नाव होतं. एका इस्लामिक दहशतवाद्याने या शिक्षकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती. याच घटनेचा पडसाद पॅरिसमध्ये उमटले आहेत. यानंतरच 2 मुस्लिम महिलांवर चाकू हल्ला झाला. यापैकी एका महिलेवर 6 वार केल्याचे समजते.

स्थानिक पोलिसांनी (Paris Police) या प्रकारात 2 महिलांना अटक केली आहे. मीडिया अहवालानुसार, हल्लेखोरांनी त्या महिलांना 'Dirty अरब' म्हणत हिणवले होते. जखमी महिला मूळच्या अल्जेरियन आहेत. केंझा आणि अमेल अशी या दोघींची नावं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पॅरिस पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर महिलांवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला जाऊ शकतो. Dailymail ने याबाबत वृत्त दिले आहे.

मोठी बातमी! ऑक्सफोर्ड कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू

यामध्ये जखमी महिलांच्या माहितीनुसार क्षुल्लक कारणावरून त्यांच्यावर हल्ला झाला. आयफेल टॉवर परिसरात त्या फिरत असताना त्यांच्याजवळ 2 कुत्री आली. त्यांनी त्यांच्या मालकिणीना सांगितले की कृपया कुत्र्यांना दूर न्या कारण मुलं घाबरत आहेत. पण त्यांनी याचा विपर्यास करून त्या महिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर बाचाबाची करत त्यांनी चाकूहल्ला केल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये अमेलच्या हाताला दुखापत झाली आहे.

First published: October 22, 2020, 12:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या