लॉस एंजेलिस, 03 नोव्हेंबर: एकच भाषा विविध लहेजांमध्ये बोलता येते किंबहुना बोलली जाते. कारण, व्यक्तीच्या आसपास असलेल्या भौगोलिक स्थितीचा आणि वातावरणाचा तिच्या बोलवण्यावर परिणाम होत असतो. इंग्रजी भाषेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेमध्ये वेगळ्या प्रकारची इंग्रजी बोलली जाते तर ऑस्ट्रेलियामध्ये वेगळी. ब्रिटनमध्ये बोलली जाणारी इंग्रजी आणि न्यूझीलंडमध्ये बोलली जाणारी इंग्रजी तर एकमेकांपासून एकदम वेगळी जाणवते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपला बोलण्याचा लहेजा कधी बदलत नाही. मात्र, अमेरिकेतील एका मुलीला याच्या उलट अनुभव आला आहे. ती मुलगी आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही न्यूझीलंडला गेलेली नाही. तरीदेखील ती अचानक न्यूझीलंड अॅक्सेंटमध्ये इंग्रजी बोलू लागली आहे. एका अपघातानंतर तिला असा अनुभव आला आहे.
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय समर डियाज या मुलीचा गेल्या वर्षी (25 नोव्हेंबर 2020) अॅक्सिडेंट झाला होता. या अॅक्सिडेंटमध्ये तिच्या डोक्यासह खांद्याला आणि ओटीपोटाला जबर मार लागला होता. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार अॅक्टिडेंटनंतर ती दोन आठवडे कोमामध्ये होती. आपला अपघात कसा झाला याबाबत तिला आता काहीही आठवत नाही. दोन आठवड्यांनंतर कोमातून बाहेर आल्यानंतर सुरुवातीला ती बोलू शकली नाही. मात्र, जेव्हा तिचा आवाज परत आला तेव्हा तिच्यासह डॉक्टरांनादेखील धक्का बसला. समर अचानक किवी (न्यूझीलंड) अॅक्सेंटमध्ये (Kiwi accent) बोलू लागली. विशेष म्हणजे समर आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही न्यूझीलंडला गेलेली नाही. तिची भाषा ऐकून हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी आश्चर्यचिकित झाले होते. पुढील तपासणी केल्यानंतर समरला फॉरेन अॅक्सेंट सिंड्रोम (Foreign Accent Syndrome) झाल्याचं निष्पन्न झालं.
हे वाचा-इंडोनेशियामध्ये सापडलं सोन्याचं बेट, नदीमधूनही बाहेर पडतंय सोनं!
फॉरेन अॅक्सेंट सिंड्रोम ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागते. विशेष म्हणजे त्या भाषेचा आणि तिचा पूर्वी कधीही संबंध आलेला नसतो. समर डियाजच्या बाबतीमध्ये हेचं झालं. 'मी शुद्धीवर आल्यानंतर सुरुवातीला मला अस्वस्थ वाटू लागलं. मी बोलू शकत नव्हते. त्यावेळी विद्यापीठात शिकलेल्या सांकेतिक भाषेची मला मदत झाली. सांकेतिक भाषेच्या मदतीनं मी संभाषण सुरू केलं. त्यानंतर मी रिहॅब सेंटरमध्ये गेले. तिथे माझा आवाज परत येऊ लागला तेव्हा लक्षात आलं की मी किवी अॅक्सेंटमध्ये बोलत आहे,' अशी माहिती समर डियाजनं जॅम प्रेसशी बोलताना दिली.
हे वाचा-पुन्हा हादरलं काबुल,शक्तिशाली स्फोटात 19 ठार; 50 हून अधिक जखमी
अशा विचित्र घटना जगभरात घडत असतात. त्या आपल्याला माहीत नसतात. पण आधुनिक वैद्यकशास्राने याबाबत बरंच संशोधन करून ठेवलं आहे. त्याच्या आधारे उपचार केले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident