Home /News /videsh /

धक्कादायक! केस कापणे पडले महागात; तब्बल 91 जणांना कोरोनाची लागण

धक्कादायक! केस कापणे पडले महागात; तब्बल 91 जणांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या वाढत्या कहरात छोटी चुकही महागात पडू शकते, त्यामुळे स्वत:साठी आणि इतरांसाठीही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

    वॉशिंग्टन, 24 मे : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढत आहे. अमेरिकेत (America) तर एका चुकीमुळे तब्बल 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत एका कोरोना पॉझिटिव्ह न्हाव्याच्या संपर्कात आल्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. द गार्डियन यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत गेल्या आठवड्यात काही व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे एका कोरोना बारबरमुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सलूनच्या 84 ग्राहकांसह 7 कर्मचाऱ्यांमध्ये पसरला कोरोना परदेशी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार बारबरमध्ये 8 दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. सेल्फ आयसोलेशन करण्याऐवजी त्याने काम सुरू ठेवले. ज्यामुळे सलूनच्या 84 ग्राहक आणि 7 कर्मचाऱ्यांनांमध्ये व्हायरस परसला. वैद्यकीय विभाग सर्व बाधित लोकांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसचा संक्रमण झपाट्याने पसरत आहे. जर याच गतीने कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर येत्या काळात मृत्यूचा आकडा तिप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेली मेलमधील एका बातमीनुसार इंपीरियल कॉलेजच्या एका नव्या आकड्यांनुसार अमेरिकेत 24 राज्यांमध्ये अनियंत्रित पद्धतीने कोरोनाचा संक्रमण पसरला आहे. हे वाचा - या तीन कारणांमुळे कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका; अभ्यासातून खुलासा कोरोनामुळे आपलेही झाले परके, 68 निराधार मृतदेहांवर योद्ध्याने केले अंत्यसंस्कार हळदीसाठी मुंबईवरून पुण्यात आले, कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर गावाची झोप उडाली
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या