हेसे (जर्मनी), 29 मार्च : जर्मनीतील (Germany) हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शाफर (54) कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान पाहून चिंताग्रस्त होते. त्यातच त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे, हे पाहून त्यांना खूप त्रास होत होता. राज्याच्या प्रीमियर वोल्करने रविवारी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. शाफर यांचा मृतदेह शनिवारी रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहे. शाफर यांच्या आत्महत्येचा घटनेवर त्यांच्या सहकार्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 'आमचा विश्वास बसत नाही', याचा सर्वांनाच मोठा धक्का बसल्याची भावना सहकार्यांनी व्यक्त केली.
संबंधित - RBI गव्हर्नर यांनी जारी केला VIDEO, अधिकाधिक डिजिटल व्यवहार करण्याचा दिला संदेश
शाफर हे गेल्या 10 वर्षांपासून वित्तीय सहयोगी होते. ते कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाविरोधात लढण्यासाठी दिवस-रात्र काम करीत होते. शिवाय विविध कंपनी व कर्मचाऱ्यांनाही मदतही करीत होते.
संबंधित - कोरोनाच्या लढ्यात त्याची मोदींना 501 रु.ची मदत, पंतप्रधानांनकडून कौतुकाची थाप
संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आला आहे. अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम करीत आहे. मात्र याचा अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. भविष्यात हे नुकसान कसं भरुन काढायचं हा मोठा प्रश्न अर्थमंत्र्यांसमोर उभा राहिला आहे. जगातील प्रत्येक देशातील सरकारकडून कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध योजना आणल्या जात आहे. अनेक देशांमध्ये गेल्या दोन व त्याहून अधिक काळापासून लॉकडाऊन आहे. यातून परिस्थितीत नियंत्रणात येईल असा सर्वांचा विश्वास आहे.