धक्कादायक! एअरपोर्टवर महिला प्रवाशांच्या प्रायव्हेट पार्टची आक्रमकपणे तपासणी

धक्कादायक! एअरपोर्टवर महिला प्रवाशांच्या प्रायव्हेट पार्टची आक्रमकपणे तपासणी

अत्यंत क्रुरपणे या महिलांना वागणूक देण्यात आली

  • Share this:

दोहा, 28 ऑक्टोबर : कतारमधील दोहा एअरपोर्टवर महिला प्रवाशांच्या प्रायव्हेट पार्टची अत्यंत आक्रमक पद्धतीने तपासल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्र्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की, 10 विमानातील महिला प्रवाशांच्या गुप्तांगाची अत्यंत क्रुरपद्धतीने तपासणी करण्यात आली. इतकच नाही सिडनीला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानातून महिला प्रवाशांना उतरण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टची आक्रमक पद्धतीने तपासणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार कतार एअरपोर्टच्या बाथरूममध्ये एक बेवारस भृण सापडलं होतं. यानंतर दोहा एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी महिलांच्या गुप्तांगाची तपासणी करण्यासाठी जबरदस्ती केली. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मरिसे पायने यांनी सीनेटमध्ये सांगितलं की, एकूण 10 एअरक्राफ्टच्या महिला प्रवाशांची झडती घेण्यात आली. हा संपूर्ण प्रकार अत्यंत त्रासदायक व आक्रमक होता.

हे ही वाचा-चक्क सिंहाच्या तोंडातून खेचून काढलं; जंगलाचा राजा आणि झेब्रामधील थरारक VIDEO

ऑस्ट्रेलिया आणि कतारमध्ये राजकीय वाद

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, 2 ऑक्टोबर रोजी सिडनी जाणाऱ्या 18 महिलांसह अनेक महिला प्रवाशांना या आक्रमक तपासातून जावे लागले. या घटनेनंतर आता ऑस्ट्रेलिया आणि कतारमध्ये राजकीय वाद उफाळला आहे. ऑस्ट्रेलियाने या घटनेवर विरोध व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाचे अधिकारी अन्य देशांसोबत मिळून काम करतात व सर्वांना सन्मानाची वागणूक देतात. या देशातील महिलांसोबत  झालेल्या वागणुकीमुळे येथील अधिकाऱ्यांना संताप व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की, ते रिपोर्टची प्रतीक्षा करीत आहे. यापूर्वीच दोहाच्या एअरपोर्टने महिलांच्या झडती केल्याचे मान्य केले आहे. मात्र एअरपोर्टने सविस्तर सांगण्यास नकार दिला आहे. एअरपोर्टने अपील केलं आहे की, बाळाच्या आईने त्याला घेऊन जावं.

Published by: Meenal Gangurde
First published: October 28, 2020, 8:33 PM IST
Tags: australia

ताज्या बातम्या