Home /News /videsh /

नेपाळी पोलिसांचं धक्कादायक कृत्य; भारतीय सीमेवरील 3 जणांवर केला गोळीबार, एक गंभीर

नेपाळी पोलिसांचं धक्कादायक कृत्य; भारतीय सीमेवरील 3 जणांवर केला गोळीबार, एक गंभीर

या गोळीबारात एक नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

    किशनजंग, 19 जुलै : भारत-नेपाळ या दोन्ही देशांमधील संबंध बिघडत चालले असताना त्याचा परिणाम आता सीमा भागातही दिसून येत आहे. शनिवारी नेपाळ सीमाजवळील बिहारमधील किशनगंजमध्ये नेपाळी पोलिसांनी भारतीय नागरिकांवर गोळीबार केला. यामध्ये एक गंभीर जखमी झाला आहे. किशनजंगचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की – नेपाळ पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांवर गोळी चालवली. ज्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. नेपाळी पोलीसद्वारे केलेल्या या गोळीबारात सीमेवर एसएसबीची टीमही अलर्ट आहे आणि संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. आतंरराष्ट्रीय संबंध बिघडत असताना नेपाळी पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nepal

    पुढील बातम्या