वॉशिंग्टन, 01 ऑगस्ट : साप म्हटलं तरी अनेकांना भीती वाटते. भल्यामोठ्या अजगरांनाच नव्हे तर साध्या छोट्या सापांनाही पाहून घाम फुटतो. पण काही लोक असे असतात जे या भल्यामोठ्या अजगरांसोबत खेळतात. त्यांच्याशी मैत्री करतात, त्यांना पाळतात, त्यांना आपल्या अंगावर घेतात. असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच भल्यामोठ्या अजगराला पाळणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. ज्या अजगराला त्याने पाळलं त्यानेच त्याचा जीव घेतला आहे.
अमेरिकेच्या पेनसिल्वेनियातील ही धक्कादायक घटना. 27 वर्षांचा इलियट सेन्समॅनने त्याच्या घरात एक साप पाळला होता. हा बोआ कॉन्सट्रिक्टरशी मिळताजुळता साप होता. तब्बल 18 फूट लांब अजगर ज्याने आपल्या मालकाचा जीव घेतला.
आज तकने एबीसी न्यूजचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार एका व्यक्तीच्या गळ्यात सापाने विळखा घातला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सेन्समॅन बेशुद्ध झाला होता. त्याच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती आणि साप त्याच्या गळ्यात होता. सापाला त्याच्या मानेतून सोडवण्यासाठी पोलिसांना बंदुकीची गोळी झाडावी लागली. त्यानंतर चार दिवस मालकावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्याचा मृत्यू झाला.
हे वाचा - WOW! कबुतराचं कधीच पाहिलं नसेल असं रूप; अद्भुत टॅलेंट पाहून थक्क व्हाल; Watch Video
इलियटला सापाने पद्धतीने विळखा घातला की त्यामुळे त्याला एनोक्सिक ब्रेन इंज्युरी झाली. त्याच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनपुरवठा थांबला आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाला., अशी माहिती लेहाई काउंटी कॉर्नर्स ऑफिसने दिली आहे.
'द मॉर्निंग कॉल' शी बोलताना सेन्समॅनच्या नातेवाईकांनी सांगितलं की तो लोकवस्तीतून साप पकडून आणायचा. तर त्याच्या एका मित्राने सांगितल्यानुसार ज्या सापाने त्याचा जीव घेतला त्याची सेन्समॅनशी मैत्री 2016 साली युनिव्हर्सिटीत झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python snake, Snake, World news