मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

गायब झालेल्या जॅक मा यांच्या 'अलिबाबा'ला चीनचा झटका

गायब झालेल्या जॅक मा यांच्या 'अलिबाबा'ला चीनचा झटका

चीनमधील (China)कम्युनिस्ट सरकारची धोरणं आणि राष्ट्राध्यक्ष शी जीनापिंग (Xi Jinping)यांच्यावर टीका करणं अलिबाबा उद्योगाचे (Alibaba Group ) संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांना अतिशय महागात पडलं आहे.

चीनमधील (China)कम्युनिस्ट सरकारची धोरणं आणि राष्ट्राध्यक्ष शी जीनापिंग (Xi Jinping)यांच्यावर टीका करणं अलिबाबा उद्योगाचे (Alibaba Group ) संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांना अतिशय महागात पडलं आहे.

चीनमधील (China)कम्युनिस्ट सरकारची धोरणं आणि राष्ट्राध्यक्ष शी जीनापिंग (Xi Jinping)यांच्यावर टीका करणं अलिबाबा उद्योगाचे (Alibaba Group ) संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांना अतिशय महागात पडलं आहे.

मुंबई, 14 जानेवारी : चीनमधील (China)कम्युनिस्ट सरकारची धोरणं आणि राष्ट्राध्यक्ष शी जीनापिंग (Xi Jinping)यांच्यावर टीका करणं अलिबाबा उद्योगाचे (Alibaba Group ) संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांना अतिशय महागात पडलं असून, चीनचे सरकार अलिबाबा आणि अँट समूह उद्योगांचे राष्ट्रीयीकरण (Nationalization) करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शांघायमध्ये दोन महिन्यांपूर्वी जॅक मा यांनी एक भाषण केलं होतं, त्यात त्यांनी बँकिंग व्यवस्था (Banking System)आणि सरकारी बँकांसंदर्भात टीका केली होती. त्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत जगभरात चर्चा सुरू असून, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चीनमधील खासगी कंपन्यांना सरकारचा इशारा जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर रोजी केलेल्या भाषणात चीनमधील सरकारी यंत्रणेसह बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकांवर कडाडून टीका केली होती. या बँका म्हणजे अर्थव्यवस्था गहाण टाकणाऱ्या लुटारू संस्था असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सरकारनं तरुण उद्योजक आणि नवीन उद्योगांना दडपणारी ही यंत्रणा बदलावी, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यांच्या या भाषणावर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जॅक मा यांच्या अँट ग्रुपचे आयपीओ रोखण्यात आले. अलिबाबा समूहासह इतर उद्योगांवरही निर्बंध घालण्यात आले, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. आता जॅक मा यांच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा सरकारचा विचार असल्याचं पुढं येत असून याद्वारे देशातील बाकी कंपन्यांना इशारा देण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट होत आहे. राष्ट्रीयीकरणानंतर अलिबाबावर जिनपिंग यांचे नियंत्रण चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेली वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या अँटी मोनोपोली वर्कपेक्षा (Anti Monopoly Work) काहीतरी चांगलं आता होणार आहे. पैशाच्या अनियंत्रित विस्तार रोखण्यासाठी पक्ष अँटी मोनोपोली वर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पीपल्स बँक ऑफ चायना, चायना बँक रेग्युलेटरी कमिशन, चायना सिक्युरिटीज रेग्युलेटरी कमिशन आणि स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्स्चेंज या संस्थाही अलिबाबा समूहाची चौकशी करतील. थोडक्यात, आता यापुढे अलिबाबा समूहाच्या अडचणी वाढणारच आहेत. अलिबाबा-अँट समूहाचं राष्ट्रीयीकरण झालं तर त्यावर शी जिनपिंग यांचा अधिकार असेल. जॅक मा यांनी शांघायमध्ये केलेल्या भाषणात म्हटलं होतं की, ‘नवीन संशोधन आता नवीन नियंत्रण यंत्रणेसह अस्तित्वात येऊ शकतं, आता जुन्या नियंत्रण यंत्रणेत काम करणं शक्य नाही. आपण रेल्वे स्टेशनचं जसं व्यवस्थापन करतो, तसं विमानतळाचं नाही करू शकत. तसंच भविष्याचं नियंत्रण आपण भूतकाळाप्रमाणे करू शकत नाही. आर्थिक जगतात आपल्याला आता क्रेडीट सिस्टीमवर आधारीत विकासाकडे वळलं पाहिजे. गहाण टाकण्याची चीनची मानसिकता ही अतिशय गंभीर समस्या असून, अनेक उद्योजकांना याचा फटका बसला आहे. उद्योजकांना आपली सगळी संपत्ती गहाण ठेवावी लागते, हे खूप गंभीर आहे. यामुळं उद्योजकांवर खूप दडपण असतं.’
First published:

पुढील बातम्या