टोकियो, 23 ऑक्टोबर: जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झालाय. ४६५ जागांपैकी अॅबेंच्या युतीला तब्बल ३१२ जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत अॅबेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. डिसेंबर २०१२ पासून अॅबे पंतप्रधानपदी विराजमान आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि उत्तर कोरियाला अद्दल घडवणे या दोन मुद्द्यांवर ते पुन्हा निवडून आले आहेत. यावर्षी अॅबेंच्या विरूद्ध युरिको कोईके आपला नवा पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.त्यांना सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे ही निवडणुक अॅबेंसाठी प्रतिष्ठेची झाली होती. पण कोईकेला 50 जागाही मिळवता आल्या नाहीत. आणि अॅबेंनी आपले पंतप्रधानपद कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
आता या विजयामुळे पूर्व आशियातलं राजकारण आणखी तापणार की काय, अशी भीती जगात निर्माण झालीय.अॅबे आणि आपल्या पंतप्रधानांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे परराष्ट्र धोरणांमध्येही सातत्य राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा