जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर

विशेष म्हणजे मोदी-आबे चर्चा नवी दिल्लीत नाही तर गांधीनगरमध्ये होणार आहे. काही वर्षांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना मोदी अहमदाबादला घेऊन गेले होते.

  • Share this:

09 सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विषयावर भारत कमकुवत भूमिका घेत नाही आणि घेणारही नाही, हे वारंवार सिद्ध होतंय. आता याचेच एक उदाहरण म्हजे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे येत्या आठवड्यात भारतात येत आहेत.

मोदींच्या कार्यकाळातला आबे यांचा हा दुसरा दौरा. विशेष म्हणजे मोदी-आबे चर्चा नवी दिल्लीत नाही तर गांधीनगरमध्ये होणार आहे. काही वर्षांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना मोदी अहमदाबादला घेऊन गेले होते. यावेळी आबेंची पाळी. याचं कारण आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं भूमिपूजन. पण राजकारणात इशारे द्यावे लागतात. आबेंना गुजरातमध्ये नेणं हा चीनला इशाराच आहे. तो इशारा हा की आम्ही जिनपिंग यांच्या इतकंच महत्त्व आबेंनाही देतो. इथे हेही लक्षात घ्यायला हवं की चीन आणि जपानचं वैर भारत-पाकिस्तानपेक्षाही जुनं आणि तीव्र आहे.

जपान हा अलिकडच्या काळात भारताचा विश्वासू जोडीदार बनत चाललाय. गेल्याच वर्षी दोन्ही देशांमध्ये अणुकरार झाला. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानकडून अतिशय कमी व्याजात कर्जही भारताला मिळणार आहे. भारत ही अतिशय मोठी बाजारपेठ आहे, हे जपान ओळखून आहेच. .

एखाद्या भेटीचं रुपांतर मोठ्या इव्हेंटमध्ये करणं ही मोदींची खासियत आहे. त्यामुळे आबेंचा दौरा चीनला खुपणार, याची काळजी मोदी नक्की घेणार यात वाद नाही.

First published: September 9, 2017, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading