Home /News /videsh /

जगासमोर इम्रान खान यांची नाचक्की! काश्मीरचा मुद्दा राहिला बाजुलाच; UNGA साठी गेलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधीनं उधळली मुक्ताफळं

जगासमोर इम्रान खान यांची नाचक्की! काश्मीरचा मुद्दा राहिला बाजुलाच; UNGA साठी गेलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधीनं उधळली मुक्ताफळं

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) पाकिस्ताननं पुन्हा एकदा स्वतःची फजिती करून घेतली आहे. पाकिस्तानचे प्रतिनिधी शहरयार खान आफ्रिदी यांनी न्यूयॉर्कमध्ये आल्यावर परिषदेतील कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी टाइम्स स्क्वेअरमध्ये फिरण्याला प्राधान्य दिलं

पुढे वाचा ...
न्यूयॉर्क, 24 सप्टेंबर: भारताचा सख्खा शेजारी असलेला पाकिस्तान नेहमीच भारताच्या कुरापती काढत असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) मुद्द्यावरून कोंडीत पकडण्यासाठी पाकिस्तान हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतो. जम्मू काश्मीरच्या सीमेवर वारंवार गोळीबार करून तसंच पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आसरा देऊन पाकिस्तान सतत भारताविरुद्ध कारवाई करत असतो. तसंच संयुक्त राष्ट्रांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताविरुद्ध मतप्रवाह निर्माण करण्यासाठी कांगावा करत असतो; पण आतापर्यंत भारतानं लष्करी पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताविरुद्ध गरळ ओकण्याच्या प्रयत्नात अनेकदा पाकिस्तानचीच नाचक्की झाली आहे. आताही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) पाकिस्ताननं पुन्हा एकदा स्वतःची फजिती करून घेतली आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेची शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या परिषदेत भाषण करणार आहेत. कोविड-19, दहशतवादाचा सामना करण्याची गरज, हवामान बदल यासह विविध जागतिक मुद्द्यावर ते आपली भूमिका मांडणार आहेत. हे वाचा-''लोकं तुमची वाट पाहत आहेत'', मोदींनी कमला हॅरिस यांना दिलं भारत भेटीचं आमंत्रण या परिषदेत पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचे (Human Rights violation) उल्लंघन होत असल्यानं इथल्या नागरिकांच्या स्थितीबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी पाकिस्तानच्या संसदीय समितीचे अध्यक्ष शहरयार खान आफ्रिदी (Shehryar Khan Afridi) यांना पाठवले आहे. शहरयार खान आफ्रिदी यांनी मात्र पाकिस्तानी नागरिकांनाच त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहण्याचा सल्ला दिल्यानं पाकिस्तानचीच फजिती झाली आहे. द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, शहरयार खान आफ्रिदी यांनी न्यूयॉर्कमध्ये आल्यावर परिषदेतील कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी टाइम्स स्क्वेअरमध्ये फिरण्याला प्राधान्य दिलं. त्यांनी टाईम्स स्क्वेअर परिसरात फेरफटका मारत तिथल्या फुटपाथवर असलेल्या बेघर लोकांचे व्हिडीओ बनवले. इतकेच नव्हे तर त्या व्हिडीओमध्ये त्यांनी तिथं असलेल्या महिलांच्या स्थितीबाबत टिप्पणीदेखील केली. ‘मानवी हक्कांवर इतरांना धडे देणाऱ्या देशानं आपल्या देशातील महिलांच्या स्थितीकडे लक्ष द्यावं. मानवाधिकारांचे रक्षक असल्याचे भासवणाऱ्या देशांपेक्षा पाकिस्तानमध्ये महिला चांगलं आयुष्य जगत आहेत,’ अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. पाकिस्तानी नागरिकांनी आपल्याला जे मिळत आहे त्याबद्दल कृतज्ञ राहावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. हे वाचा-अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी घेतली Qualcomm च्या सीईओंची भेट त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात असून, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या परिषदेत काश्मीरमधील मानवाधिकारांचा मुद्दा मांडून भारताची नाचक्की करण्याचा डाव पाकिस्तानवरच उलटला आहे.
First published:

Tags: Imran khan, Jammu and kashmir

पुढील बातम्या