शीतल महाजननं थायलंडमध्ये केलं नऊवारी साडीत स्काय डायव्हिंग

शीतल महाजननं थायलंडमध्ये केलं नऊवारी साडीत स्काय डायव्हिंग

नऊवारी साडी नेसून 13000 फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग करणारी ती जगातली एकमेव ठरलीय.

  • Share this:

12 फेब्रुवारी : मराठमोळ्या शीतल महाजननं थायलंडमध्ये नऊवारी साडीमध्ये स्काय डायव्हिंग केलंय.  नऊवारी साडी नेसून 13000 फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग करणारी ती जगातली एकमेव ठरलीय. याला जागतिक रेकॉर्ड म्हणून मान्यता मिळणार नसली तरी मराठी बाणा दाखवण्याचा हेतू असल्याचं शीतलनं सांगितलंय. आतापर्यंत तिनं स्काय डायव्हिंगमध्ये 17 राष्ट्रीय तर 6 जागतिक विक्रम केलेत.

शीतल महाजन यांचा जन्म पुण्याचा, मूळ गाव जळगाव. शीतल बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. पहिल्यापासून काही तरी वेगळं करण्याचा ध्यास शीतलला आहे. 17 सप्टेंबर 2017पर्यंत शीतलनं 700 पॅरॅशूट जंप्स केल्यात.

First published: February 12, 2018, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading