Home /News /videsh /

शेम ऑन यू पाकिस्तान गव्हर्नमेंट, भारताकडून काहीतरी शिका; पाक विद्यार्थ्याचा रोष

शेम ऑन यू पाकिस्तान गव्हर्नमेंट, भारताकडून काहीतरी शिका; पाक विद्यार्थ्याचा रोष

...म्हणून भारत पाकिस्तानपेक्षा भारी

    पेइचिंग, 2 फेब्रुवारी : चीनमधील वुहान येथील कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी इतर देशातील दूतावास आपल्या नागरिकांना स्वदेशी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचे केंद्र वुहानमध्ये पाकिस्तानी विद्यार्थीदेखील अडकले आहेत. मात्र पाकिस्तानच्या इमरान खान सरकारने त्यांना पुन्हा पाकिस्तानात न आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या पाकिस्तानी विद्यार्थ्यांला खूप दु:ख झाले आहे. य़ाचा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे लक्षात येऊ शकते. या व्हिडिओमध्ये भारतीय विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसमध्ये बसत आहेत. याचे चित्रण पाकिस्तानी विद्यार्थ्याने आपल्या मोबाइलमध्ये केले आहे. आणि आपल्या सरकारविरोधात निराशा व्यक्त केली आहे. पाक पत्रकार नायला इनायतने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक विद्यार्थी म्हणतोय की, हे लोक भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यांना घेऊन जाण्यासाठी दूतावासांनी बस पाठवली आहे. वुहान विद्यापीठातून ही बस एयरपोर्टला नेण्यात येईल. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचविण्यात येईल. बांगलादेश सरकारकडूनही विद्यार्थ्यांना नेण्यासाठी बस पाठविण्यात येणार आहे. चीनहून परतण्यासाठी काही भारतीय विद्यार्थ्यांची तयारी नाही पाकिस्तानी विद्यार्थ्याने सांगितले, की आम्ही एक पाकिस्तानी विद्यार्थी आहोत, जे इथे अडकले आहोत. ज्यांची सरकार म्हणते, आपण जिवंत रहा की मरा. संक्रमण होत असेल तर होऊदे. आम्ही तुम्हाला कोणतीही सुविधा देणार नाही आणि स्वदेशीही घेऊन जाणार नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी पाक सरकार. तुम्हाला भारताकडून काहीतरी शिकायला हवं. ते कशा पद्धतीने आपल्या नागरिकांना साहाय्य करीत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Coronavirus, Wuhan

    पुढील बातम्या