Home /News /videsh /

Ukraine-Russia War दरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा 'तो' VIDEO व्हायरल

Ukraine-Russia War दरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा 'तो' VIDEO व्हायरल

Shah Rukh Khan Viral Video

Shah Rukh Khan Viral Video

रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine-Russia War ) युद्ध सलग 20 व्या दिवशीही सुरूच आहे. याच दरम्यान, बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख ( Shah Rukh Khan) चर्चेत आला आहे. या युद्धामुळे शहराचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शहरातील शेकडो युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 16 मार्च: रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine-Russia War ) युद्ध सलग 20 व्या दिवशीही सुरूच आहे. याच दरम्यान, बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख ( Shah Rukh Khan) चर्चेत आला आहे. या युद्धामुळे शहराचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शहरातील शेकडो युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. संपूर्ण जग युद्ध थांबण्याची वाट पाहत आहे. अशातच बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच सुपरस्टार शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो युद्धाबद्दल बोलत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धा दरम्यान, शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ जुना आहे. ज्यामध्ये तो युद्धामुळे झालेल्या नुकसानाबद्दल प्रेरणादायी गोष्टी बोलताना दिसत आहे. शाहरुख खानचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो 2001चा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. ''जो युद्धात मरतो त्यालाच युद्धाचा शेवट दिसतो. युद्ध कधी संपणार हे कोणालाच माहीत नाही, ते युद्धात मरण पावलेल्यांनाच संपते. म्हणूनच युद्धात काहीही परिपूर्ण नाही, सर्व काही व्यर्थ आहे.'' असे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
  तसेच, युद्धात खूप दुःख आणि खूप एकटेपणाल जाणवतो. युद्धात खूप दुःख आणि खूप एकटेपणा असतो. यासाठी तुम्ही कोणतेही कारण द्या, चांगले, वाईट, कुरूप, बदला घेणारे, काळाची गरज आहे. पण सत्य हे आहे की युद्ध चांगले नाही. युद्ध हा शांतता आणि चांगुलपणाचा पर्याय नाही. युद्ध हा प्रेम, चर्चा, संभाषण आणि अगदी मारामारीचा पर्याय नाही. युद्ध ही अशी गोष्ट नाही की ज्यासाठी तयारी करावी लागते. असे त्याने व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.किंग खानचा हा व्हिडिओ जुना आहे, मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या काळात हा व्हिडिओ सांगत आहे की युद्ध हा शांतता आणि चांगुलपणाचा पर्याय नाही. रशिया युक्रेनमधील शहरांतील निवासी भागांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. युद्धात आतापर्यंत 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Russia Ukraine, Russia's Putin

  पुढील बातम्या