शाहीद अब्बासी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

शाहीद अब्बासी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) चे उमेदवार शाहीद खाकन अब्बासी यांची हंगामी पंतप्रधानपदी निवड झाली

  • Share this:

01 आॅगस्ट : पाकिस्तानला आज अखेर नवे पंतप्रधान मिऴाले. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) चे उमेदवार शाहीद खाकन अब्बासी यांची हंगामी पंतप्रधानपदी निवड झाली. ते पाकचे 18 वे पंतप्रधान म्हणून निवडले गेले.

पाकिस्तानच्या संसदेत आज पंतप्रधानपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात अब्बासी यांची हंगामी पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात आली. शाहीद खाकन अब्बासी हे येत्या 45 दिवस ते पंतप्रधानपदी राहणार आहेत. त्यांना 342 पैकी 221 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात सईद नावीद कमार उभे होते. त्यांना 47 मतं मिळाली.

नवाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यावर पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता होती. पण आता माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री असलेले अब्बासी हे पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. आता अब्बासी यांचं लष्कराशी कसं जमतं, ते पाहणं ठरणार आहे.

First published: August 1, 2017, 11:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading