संतापजनक! मदरशात विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण; म्हाताऱ्या मौलवीचा सेक्स व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामध्ये एक वयोवृद्ध मौलवी (Old cleric) एका विद्यार्थ्यासोबत समलैंगिक संबंध (Homosexual relation) ठेवताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामध्ये एक वयोवृद्ध मौलवी (Old cleric) एका विद्यार्थ्यासोबत समलैंगिक संबंध (Homosexual relation) ठेवताना दिसत आहे.

  • Share this:
    लाहोर, 19 जून: सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामध्ये एक वयोवृद्ध मौलवी (Old cleric) एका विद्यार्थ्यासोबत समलैंगिक संबंध (Homosexual relation) ठेवताना दिसत आहे. मागील बऱ्याच काळापासून आरोपी मौलवी पीडित विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करत होता. त्यामुळे पीडित विद्यार्थ्यानं मौलवीच्या त्रासाला कंटाळून स्वतः व्हिडीओ बनवला असून सोशल मीडियात व्हायरल केला आहे. या घटनेनंतर आरोपी मौलवीला अटक झाली असून त्याच्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणे आणि धमकी देणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना पाकिस्तानातील लाहोर येथील असून आरोपी मौलवीचं नाव मौलाना मुफ्ती अजीजुर रहमान असं आहे. आरोपी मौलवी पाकिस्तानातील एक प्रसिद्ध मौलवी आहे. सामानानं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित विद्यार्थ्यांनं 2013 साली लाहोरच्या जामिला मंजुरूल इस्लामिया या मदरशात प्रवेश घेतला होता. दरम्यान पीडित विद्यार्थ्यानं आणि अन्य एकानं परीक्षेत नकल केल्याचा आरोप करत त्यांना मदरशातून तीन वर्षांसाठी निलंबित केलं होतं. पीडित विद्यार्थ्यानं तीन वर्षानंतर पुन्हा त्याच मदरशात प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला. पण आरोपी मौलवीनं त्याचा अर्ज स्विकारला नाही. शिवाय आपला निर्णय बदलण्यास नकार दिला. संबंधित विद्यार्थ्यानं आपल्याशी समलैंगिक संबंध ठेवल्यास विद्यार्थ्याची निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल, असा आरोप पीडित विद्यार्थ्याकडून करण्यात आला आहे. आरोपी मौलवीनं समलैंगिक संबंधाची मागणी केल्यानंतर, पीडित विद्यार्थ्यानं मदरशाकडे याची तक्रार केली. पण त्याचं कुणीही ऐकून घेतलं नाही. शिवाय मदरशातील मौलवी एकदम पवित्र असल्याचा दावा मदरशा प्रशासनाकडून करण्यात आला. हेही वाचा-महिलेनं पुजाऱ्याला दिला चपलेचा प्रसाद; व्हिडिओ व्हायरल होताच आत्महत्येचा प्रयत्न यानंतर पीडित विद्यार्थ्यानं स्वतः या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे. म्हाताऱ्या मौलवीचा समलैंगिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मौलवीला अटक केली आहे. मौलवीच्या अटकेनंतर मौलवीच्या मुलाकडून धमकी दिली जात असल्याचंही पीडित विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपी मौलवीविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणं आणि धमकी देणं असे गुन्हे दाखल केले आहेत. पाकिस्तानी जनतेनं देखील आरोपी मौलवीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: