धक्कादायक! क्वारंटाइन सेंटरमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट, शेकडो लोकं निघाली कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक! क्वारंटाइन सेंटरमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट, शेकडो लोकं निघाली कोरोना पॉझिटिव्ह

या हॉटेल्समध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांना ठेवण्यात आले होते. मात्र या हॉटेल्समध्ये सेस्क रॅकेट सुरू करण्यात आले, परिणामी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला.

  • Share this:

मेलबर्न, 03 जुलै : कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात थैमान घालत आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या (Australia), मेलबर्नमध्ये कोरोनाच्या संक्रमणाची एक विचित्र घटना घडली, या घटनेनं सर्वांना थक्क केलं. सध्या मेलबर्नमधील काही हॉटेल्स हे कोरोना रूग्ण आणि संशयितांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरले जात आहेत. मात्र आता या हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येनं लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

CNN ने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील या हॉटेल्समध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांना ठेवण्यात आले होते. मात्र या हॉटेल्समध्ये सेस्क रॅकेट सुरू करण्यात आले, परिणामी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. दरम्यान, आता राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, मे आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे या सेक्स रॅकेटमुळे आढळून आली.

वाचा-भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन

कोरोनामुळं ऑस्ट्रेलियामधील नागरिक आणि कायमस्वरुपी रहिवाशांना देशात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जो कोणी ऑस्ट्रेलियात येईल त्याला 14 दिवस क्वारंटाइन राहण्याचा नियम आहे. यासाठी बर्‍याच हॉटेल्समध्ये क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, कारण मुंबई व इतर देशातील शेकडो लोक येथे येत आहेत. भारतातील मुंबईहून 300 अॅडलेडला किमान 300 लोक येत आहेत, तर दक्षिण अमेरिका आणि इंडोनेशियातून शेकडो लोक येत आहेत.

वाचा-कोरोना रुग्णांना लुबाडणाऱ्या नामांकित रुग्णालयाला BMC चा दणका; FIR दाखल

दक्षिण ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री स्टीफन वेड म्हणाले की, परदेशातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या पाच ते दहा टक्के लोकांना संसर्ग होऊ शकेल, हे विचारात घेऊन तयारी सुरू केली जात आहे. यापूर्वी इंडोनेशिया व इतर देशांमधून लोक येण्यामुळे संसर्गाची प्रकरणे वाढली होती. शुक्रवारी मेलबर्नमध्ये संक्रमणाची 30 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. देशात संसर्गाची 7,600 प्रकरणे आहेत आणि 104 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-घाम आणि दुर्गंधीच नाही तर आता कोरोनालाही शरीरापासून दूर ठेवणार Deodorant

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 3, 2020, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading