Home /News /videsh /

सभागृहात माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार, अनेक जखमी; हल्लेखोर ठार

सभागृहात माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार, अनेक जखमी; हल्लेखोर ठार

हातात बंदूक घेऊन सभागृहात शिरलेल्या माथेफिरूनं उपस्थितांवर थेट गोळीबारच करायला सुरुवात केली. यात अनेकजण जखमी झाले.

    फ्रँकफर्ट, 24 जानेवारी: एका माथेफिरूनचे (Psycho) कार्यक्रम सुरू असणाऱ्या एका सभागृहात (Lecture Hall) प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार (firing) करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या गोळीबाराने एकच गोंधळ उडाला. जर्मनीतील (Germany) फ्रँकफर्ट (Frankfurt) शहरात हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. माथेफिरून हल्लेखोराला पोलिसांनी अखेर ठार केलं असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. असा केला हल्ला माथेफिरू एक मोठी बंदूक घेऊन सभागृहात शिरला. जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरात ही घटना घडली. सोमवारी या सभागृहात एक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी अचानक कार्यक्रमात बंदूक घेऊन शिरलेल्या हल्लेखोरानं आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडायला सुरुवात केली. अचानक गोळीबार सुरू झालेला पाहून सुरुवातीला कुणालाच काही समजेना. सभागृहात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपैकी एखाद्या व्यक्तीशी हल्लेखोराची काहीतरी वैयक्तिक दुश्मनी असेल, असं अनेकांना वाटलं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. हल्लेखोर माथेफिरू होता आणि त्याने उपस्थितांवर स्वैरपणे गोळीबार करायला सुरुवात केली. अनेकजण जखमी अचानक गोळीबार सुरू झाल्यामुळे सभागृहात असलेल्या नागरिकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी खुर्च्यांचा आणि इतर साधनांचा आसरा घ्यायला सुरुवात केली. मात्र काही नागरिकांना माथेफिरूच्या बंदुकीतील गोळ्या लागल्या आणि ते गंभीररित्या जखमी झाले. पोलिसांनी केलं ठार या हल्ल्याची कल्पना मिळाल्यानंतर पोलिसांनी शहरातील त्या भागात नाकेबंदी केली आणि परिसरातील वाहतूक इतर मार्गाने वळवली. रस्ते पूर्ण रिकामे करून पोलिसांनी या सभागृहाला घेराव घातला आणि सभागृहाकडे एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. आपल्याच धुंदीत असलेल्या आणि उपस्थितांवर गोळीबार करणाऱ्या माथेफिरूनला पोलिसांनी टिपलं आणि त्याच्यावर गोळी झाडली. यात हा माथेफिरू हल्लेखोर ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हे वाचा- मुस्लीम मंत्र्याच्या हकालपट्टीची चौकशी करा, ब्रिटीश पंतप्रधानांचे आदेश जखमींचा आकडा अस्पष्ट या घटनेत नेमके किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. त्याचप्रमाणे ते किती गंभीर आहेत, याचीही माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Fire, Germany, Police

    पुढील बातम्या