अमेरिकेतील प्रसिद्ध मॉलमध्ये शूटआऊट, 8 लोकं जखमी; गोळीबार करणारी व्यक्ती फरार

अमेरिकेतील प्रसिद्ध मॉलमध्ये शूटआऊट, 8 लोकं जखमी; गोळीबार करणारी व्यक्ती फरार

विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी (Myfair mall) येथील मेफिल्ड शॉपिंग मॉलमध्ये अचानक गोळीबार झाला तेव्हा मॉलमधील उपस्थित लोकं घाबरुन गेले.

  • Share this:

वॉशिंग्टन, 21 नोव्हेंबर : अमेरिकेतील (America) विस्कॉन्सिन (Wisconsin mall) येथील मॉलमध्ये शुक्रवारी अंदाधूंद गोळीबार झाला. या गोळीबारात आतापर्यंत 8 लोकं गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, अद्याप पोलिसांनी गोळीबार करणारा व्यक्ती कोण होता, याबाबत कोणतीही माहिती नसून सध्या चौकशी सुरू आहे.

स्थानिक नगराध्यक्ष डेनिस मॅकब्राइड यांच्या म्हणण्यानुसार, विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी (Myfair mall) येथील मेफिल्ड शॉपिंग मॉलमध्ये अचानक गोळीबार झाला तेव्हा मॉलमधील उपस्थित लोकं घाबरुन गेले. या घटनेत आतापर्यंत 8 लोक जखमी झाल्याची नोंद आहे. मात्र गोळीबारात कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली नाही.

गोळीबार सुरू होताच पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरला, तरी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले. सुमारे 75 अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना स्ट्रेचरवर मॉलच्या बाहेर नेले जात असल्याचे दिसून आले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 21, 2020, 8:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या