मॉस्कोजवळ विमान कोसळलं; 71 जणांचा मृत्यू

मॉस्कोजवळ विमान कोसळलं; 71 जणांचा मृत्यू

या अपघातात विमानाचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती विमान कंपनीनं दिलीय.. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही..

  • Share this:

11 फेब्रुवारी:  रशियाचं प्रवासी विमान मॉस्कोजवळ कोसळलं आहे.  या अपघातात ७१ जण मृत्युमुखी पडले आहेत.   खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे.  दुर्घटनाग्रस्त झालेले विमान रशियाची देशांतर्गत विमान कंपनी असलेल्या सारातोव एअरलाईन्सचं आहे.  हे विमान ओर्स्कला जाण्यासाठी निघालं होतं. या विमानात 65 रशियन प्रवासी आणि 6 कर्मचारी होते.

या अपघातात विमानाचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती विमान कंपनीनं दिलीय. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही..

विमान कंपनीने या वृत्ताला पुष्टी दिली असून विमानाचा एक भाग पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रशियाच्या आणीबाणी मंत्रालयाने दुर्घटनास्थळी एक पथक रवाना केले आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अरुगुनोवो गावातील प्रत्यक्षदर्शींनी पेटते विमान आकाशातून कोसळताना पाहिल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, अद्याप ही दुर्घटना कशामुळे घडली याची माहिती मिळू शकलेली नाही. माध्यमांच्या माहितीनुसार, रशियाचे परराष्ट्र मंत्रालय या घटनेच्या अनेक शक्यता पडताळून पाहत आहे. खराब हवामान आणि पायलटच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता मानून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

First published: February 11, 2018, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading