मुंबई 05 मार्च : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी संकटं येत असतात. काही लोक या समस्यांसमोर हार मानतात तर काहींमध्ये ही हार पचवून पुढे जाण्याची क्षमताही असते. आजकाल अशाच एका मुलीची सुंदर कथा ऐकून अनेकांचं मनं सुन्न झालं आहे. अमेरिकेतील एक 7 वर्षांची मुलगी आपल्या उपचारासाठी बेकरीमध्ये लिंबू पाण्याची विक्री करीत आहे. पुढील काही दिवसात लिझा स्कॉट (Liza Scott) हिच्या मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ही चिमुकली आपल्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमा करत आहे, जेणेकरून ती तिच्या कुटुंबावरील ओझं कमी करू शकेल.
एका रिपोर्टनुसार, ही मुलगी पैसे जमा करण्यासाठी आपल्याचा आई एलिजाबेथच्या बेकरीमध्ये काम करते. तिनं अमेरिकेच्या अलबामा येथे Savage बेकरीमध्ये लिंबू पाणीचा स्टॉल लावला आहे. इथे येऊन जे लोक हे लिंबू पाणी पितात त्यांना लिझा मदत मागते. लिझाच्या आईनं तिच्या आजाराविषयी माहिती देताना म्हटलं, की तिच्या मेंदूमध्ये तीन ठिकाणी अडचणी आहेत. याच कारणामुळे अनेकदा तिला झटकेही येतात.
सात मुलांना जन्म दिला म्हणून दाम्पत्याला 1 कोटींचा दंड
एका महिन्यापूर्वी लिझाला हा झटका आल्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर तिच्या या गंभीर आजाराबद्दलची माहिती समोर आली. सेरेब्रल मॅलफॉर्मेशनमध्ये साधारणतः एकाच ठिकाणी परिणाम दिसतो. मात्र, लिसाच्या बाबतीत तिला तीन जागांवर याचा त्रास असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या सगळ्या अडचणींनंतरही लिझाची हिम्मत कायम आहे. लिसाला ही हिंमत तिच्या आईनं दिली आहे. लिझाला जेव्हा त्रास होतो किंवा या आजारामुळे तिला झोप येत नाही तेव्हा तिची आई तिच्यासाठी प्रार्थना करते आणि याच गोष्टीनं तिला अधिक बळ मिळतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brain, Rare disease