मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अवघ्या सात वर्षांचा कोट्याधीश उद्योगपती, स्वत:च्या कपड्यांच्या व्यवसायातून बक्कड कमाई

अवघ्या सात वर्षांचा कोट्याधीश उद्योगपती, स्वत:च्या कपड्यांच्या व्यवसायातून बक्कड कमाई

सात वर्षांचा हंटर कर्टिस आपल्या आईच्या मदतीने, त्याच्या वयाच्या मुलांसाठी कपडे डिझाईन करतो आणि सोशल मीडियावर त्यांचे ब्रँडिंगदेखील करतो.

सात वर्षांचा हंटर कर्टिस आपल्या आईच्या मदतीने, त्याच्या वयाच्या मुलांसाठी कपडे डिझाईन करतो आणि सोशल मीडियावर त्यांचे ब्रँडिंगदेखील करतो.

सात वर्षांचा हंटर कर्टिस आपल्या आईच्या मदतीने, त्याच्या वयाच्या मुलांसाठी कपडे डिझाईन करतो आणि सोशल मीडियावर त्यांचे ब्रँडिंगदेखील करतो.

    मुंबई, 21 डिसेंबर : शिक्षण पूर्ण झाल्याखेरीज नोकरी, व्यवसाय (Business) करण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र काहीजण जगावेगळे असतात. त्यांना कोणत्याच बाबतीत वयाची, अनुभवाची अट लागू होत नाही. कोणी विचारदेखील करू शकणार नाही इतक्या कमी वयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची त्यांची क्षमता असते. असाच एक जगावेगळा मुलगा आहे ऑस्ट्रेलियाचा (Australia) हंटर कर्टिस (Hunter Curtis). व्यवसाय सुरू करायला कोणत्याही वयाची अट नसते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हंटर कर्टीस. वयाच्या सातव्या वर्षी या मुलाने त्याचा कपड्यांचा व्यवसाय (Clothing Business) सुरू केला आहे. इतक्या लहान वयात फॅशन क्लोदिंग लाइनचा (Fashion Clothing Line) व्यवसाय सुरू करणारा हा जगताला एकमेव मुलगा असावा.

    सात वर्षांचा हंटर कर्टिस आपल्या आईच्या मदतीने, त्याच्या वयाच्या मुलांसाठी कपडे डिझाईन करतो आणि सोशल मीडियावर त्यांचे ब्रँडिंगदेखील करतो. वयाच्या सातव्या वर्षी मुलं खेळतात, शाळेत जातात, मजा, मस्ती, अभ्यास करतात; पण हंटर मात्र त्याला अपवाद आहे. खरंतर त्याचं कुटुंबच, कारण हंटर स्वतःचा व्यवसाय करतोच पण त्याची 10 वर्षांची बहिणही स्वतःचा व्यवसाय करते. त्यांची आईही उत्तम व्यवस्थापक आणि जनसंपर्क गुरु आहे.

    हेही वाचा : कॅन्सरवरील उपचारांमुळे होतो सेक्स लाईफवर परिणाम? महिलेनं सांगितला वाईट अनुभव

    ऑस्ट्रेलियाचा राहणाऱ्या हंटरने अगदी लहान वयातच आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्यानं युनिसेक्स स्ट्रीटवेअर कपड्यांचा (Unisex Streetware) व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या कपड्यांच्या ब्रँडचं नाव hpcbrand असं आहे. या अंतर्गत तो मुलांसाठी कपडे बनवतो. तसंच त्या सोबत योग्य वाटतील अशा अॅसेसरीजही (Accesories) तयार करतो. या व्यवसायांतर्गत त्यानं कपड्यांची संपूर्ण मालिका दाखल केली असून, @hpcbrand नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती शेअर केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, हंटरचा ब्रँड चांगला लोकप्रिय आहे. त्यामुळे वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी हंटर यशस्वी उद्योजक बनला आहे. आपल्या व्यवसायातून तो कोट्यवधींची कमाई करत आहे.

    हेही वाचा : सकाळच्या नाश्त्यामध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

    विशेष म्हणजे हंटर एकटाच व्यवसाय करत नसून त्याच्या घरात त्याची आई, बहिण या देखील व्यावसायिक आहेत. हंटरची 10 वर्षांची बहीण (Sister) पिक्सी कर्टिस (Pixy Curtis)हिनेही लहान वयातच तिचा व्यवसाय सुरू केला असून, तिने एका महिन्यात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. तिची Pixie's Fidgets नावाची कंपनी आहे. हंटर आणि पिक्सी यांची आई रॉक्सी (Roxy) आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. रॉक्सी स्वतः एक यशस्वी जनसंपर्क गुरु असून, ती उत्तम व्यवस्थापक आहे. रॉक्सीने आणि मुलगी पिक्सी हिच्याबरोबर मे महिन्यात खेळण्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांची सर्व खेळणी अवघ्या 48 तासांत विकली गेली आणि हे त्यांचे पहिले यश होते. रॉक्सीने सांगितले की पहिल्या महिन्यातच त्यांच्या कंपनीची उलाढाल 2 लाख डॉलर्स म्हणजेच 1 कोटींपेक्षाही जास्त होती. यानंतर, पिक्सीने पिक्सी बोज नावाचा आपल्या कंपनीचा हेअर अॅसेसरीजचा एक ब्रँडदेखील तयार केला आहे.

    First published:
    top videos