दारुऐवजी प्यायले सॅनिटायझर, 7 जणांनी गमावला जीव तर दोघेजण कोमात

दारुऐवजी प्यायले सॅनिटायझर, 7 जणांनी गमावला जीव तर दोघेजण कोमात

कोरोनाकाळात (Coronavirus) सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र रशियामध्ये सॅनिटायझरचा चुकीचा वापर जीवावर बेतला आहे

  • Share this:

याकुतिया, 25 नोव्हेंबर: कोरोनाकाळात (Coronavirus) सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र रशियामध्ये सॅनिटायझरचा चुकीचा वापर जीवावर बेतला आहे. रशियातील याकुतिया (Yakutia) याठिकाणी  7 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण कोमामध्ये गेले आहेत. सॅनिटायझरचे सेवन केल्याने या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रशियामधील स्थानिक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, टोमटर या गावातील 9 स्थानिकांनी स्थानिक दुकानातून हँड सॅनिटायझर विकत घेऊन ते प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली. घटनास्थळावर पोलिसांना विना लेबलचे पाच लिटरचे सॅनिटायझरचे कॅन आढळून आले आहेत. सध्या महामारीमुळे सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्यात अल्कोहोल असल्याने या गरीबांनी सॅनिटायझरचं सेवन केलं.

यामध्ये 69 टक्के मिथेनॉल आणि नॉन ड्रिंकिंग अल्कोहोल आढळून आले आहे. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित सहा जणांना जवळच्या याकुत्स्क याठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यातील चार जणांचा देखील मृत्यू झाला असून उर्वरित दोन जण कोमामध्ये गेले आहेत. डॉक्टर सध्या या दोघांचे प्राण वाचवण्याचे अथक प्रयत्न करत आहेत. 48 वर्षीय महिला आणि 32 वर्षीय पुरुष असे दोघंजणं कोमामध्ये गेले आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती स्थानिक आरोग्य प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर रविवारी याकुत्स्क प्रशासनाने मिथेनॉल युक्त हँड सॅनिटायझरच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हे वाचा-Gold Price: 3 दिवसात 2000 रुपयांनी उतरलं सोनं, येणाऱ्या काळात आणखी घसरणीचे संकेत)

सॅनिटायझर स्वस्त असल्याने रशियाच्या गरीब भागांत अल्कोहोलला पर्याय म्हणून हे पिण्याची परंपरा नवीन नाही. 2016 मध्ये,  सायबेरियाच्या इर्कुटस्क प्रदेशात हॅथॉर्न-इन्फ्युज्ड बाथ लोशनचे सेवन केल्याने 100 हून अधिक लोकांना विषबाधा झाली होती. यामध्ये  78 जणांचा मृत्यू झाला होता. अंघोळीच्या उत्पादनामध्ये मिथेनॉल देखील असते यामुळे  शरीरात गेल्यानंतर त्याचं विष तयार होऊन ते मज्जासंस्थेवर आघात करतं, त्यामुळे अंधत्व येऊन श्वसनसंस्थेला देखील नुकसान होऊ शकते. अलीकडच्या वर्षांत रशियामध्ये अल्कोहोल घेण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरीही मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर त्याच्या वापरात पुन्हा वाढ झाली आहे. या घटनेनंतर याकुत्स्कच्या गव्हर्नरनी शहर आणि आसपासच्या अनेक जिल्ह्यांत अल्कोहोल विक्रीवर आठवडाभर बंदी घातली आहे.

(हे वाचा-वर्षाला 330 रुपये भरून मिळेल 2 लाखाचा फायदा, वाचा काय आहे पोस्ट ऑफिसची योजना)

भारतातही देशी दारू प्यायलाने दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यु होत असतो. महागडी दारू परवडत नसल्याने मजूर, शेतकामगार ही देशी दारू पितात ज्यामुळे त्यांना प्राणाला मुकावं लागतं. रशियातील आर्थिकदृष्ट्या मागास भागांतही तशीच परिस्थिती असल्याचं या बातमीमुळे दिसून आलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 25, 2020, 3:52 PM IST
Tags: russia

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading