भारत आणि इस्त्रायलमध्ये 7 महत्त्वपूर्ण करार

या करारामध्ये इस्त्रो आणि इस्त्रायलची अंतराळ संशोधन संस्थेदरम्यान महत्त्वपूर्ण करार झालाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2017 06:32 PM IST

भारत आणि इस्त्रायलमध्ये 7 महत्त्वपूर्ण करार

05 जुलै : इस्त्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यात झालेल्या प्रतिनिधीमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहे. या करारामध्ये इस्त्रो आणि इस्त्रायलची अंतराळ संशोधन संस्थेदरम्यान महत्त्वपूर्ण करार झालाय. तसंच दोन्ही देशामध्ये कृषि क्षेत्राबाबतही विशेष करार झालाय.

या करारानंतर दोन्ही नेत्यांनी मीडियासोबत संवाद साधला. आम्ही पश्चिम आशियासह इतर भागातील परिस्थितीवर चर्चा केली.  आम्ही शांततेच्या मार्गाला नेहमी प्राधान्य देत आलोत. ज्या प्रमाणे भारत दहशवादाचा सामना करतोय तसाच सामना इस्त्रायल करतोय. दहशतवादाविरोधात दोन्ही देशांनी एकत्र लढण्यास सहमती दर्शवलीये असं यावेळी मोदी म्हणाले.  विकासाबद्दल दोन्ही देशाची एकच भूमिका आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध दृढ होण्यास मदत होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. यावेळी मोदींनी इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच इस्त्रायलच्या आदरतिथ्याचं मोदींनी आभार मानले.

तर, दहशतवादी संघटना आपल्यापुढे आव्हानं देत आहे. याचा बिमोड करण्यासाठी एकत्र लढलं पाहिजे यावर आम्ही सहमती दिलीये असं बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं. तसंच मोदींसोबत झालेल्या भेटीबद्दल 'आमची जोडी स्वर्गात बनलीये' असंही नेतन्याहू म्हणाले.

याआधी पंतप्रधान मोदींनी इस्त्रायलचे राष्ट्रपती रियूवेन रिविलन यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करताना भारत आणि इस्त्रायल ए्क चांगले संबंध निर्माण होतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रात संबंध चांगले होईल असं रिविलन म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...