Home /News /videsh /

भारत सरकारचं मोठं यश! 6000 किमी दूर अतिरेक्यांच्या तावडीत सापडलेल्या 7 देशवासीयांची केली सुटका

भारत सरकारचं मोठं यश! 6000 किमी दूर अतिरेक्यांच्या तावडीत सापडलेल्या 7 देशवासीयांची केली सुटका

लिबियात बांधकाम आणि ऑइल कंपनीमध्ये काम करण्यासाठी हे भारतातून तिथे गेले होते. एअरपोर्टवर जात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं.

    त्रिपोली (लिबिया), 12 ऑक्टोबर : परकीय देशात, तेही अशा देशात जिथे भारतीय दूतावासदेखील नाही... अशा ठिकाणी 7 भारतीय दहशतवाद्यांच्या तावडीत सापडले होते. अखेर शेजाच्या ट्युनिशिया देशात कार्यरत असलेल्या भारतीय मुत्सद्द्यांच्या मदतीने या भारतीय नागरिकांची सहीसलामत सुटका करण्यात आली आहे. आता त्यांना लवकरच मायदेशी आणण्यात येणार आहे, अशं ट्यूनिशियातले भारताचे राजदूत पुनीत रॉय किंडल यांनी सांगितलं. उत्तर आफ्रिकेत असणाऱ्या लिबिया देसातून अपहरण झालेल्या 7 भारतीय नागरिकांची अखेर सुटका करण्यात आली आहे. ट्युनिशियातील भारताचे राजदूत पुनीत रॉय कुंडल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 14 सप्टेंबरला या सात जणांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. ही गोष्ट समोर आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि ट्यूनिशियातील भारतीय दूतावासाने या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. कोण होते हे 7 जण? आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील हे नागरिक आहेत. प्रामुख्याने लिबियात बांधकाम आणि ऑइल कंपनीमध्ये काम करण्यासाठी हे भारतातून तिथे गेले होते. एअरपोर्टवर जात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. लिबियामध्ये भारतीय दूतावास नसून ट्युनिशियामधील भारतीय दूतावासाने या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. राज्यांसाठी 12 हजार कोटी रुपयांची व्याजमुक्त स्पेशल लोन ऑफर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व नागरिक सुरक्षित आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याविषयीची माहिती दिली आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितलं, ट्युनिशियामधील भारतीय दूतावास लिबियातील नागरिकांसंबंधी विषय हाताळतो. भारतीय दूतावास लिबिया आणि ट्युनिशिया सरकारच्या संपर्कात असून लवकरच या नागरिकांना भारतात आणलं जाणार आहे. या सर्व जणांचं 14 सप्टेंबरला अशवरीफ या ठिकाणाहून अपहरण करण्यात आले होते. त्रिपोली एयरपोर्टकडे जात असताना त्याचं अपहरण झालं होतं. या सर्व जणांना सुरक्षित ठेवलं गेलं होतं. अपहरणकर्त्यांनी दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना काही फोटो पाठवले असून यामध्ये या व्यक्ती सुरक्षित असल्याचं दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे, भारत सरकारने सप्टेंबर 2015 पासून लिबियामध्ये न जाण्याचा सल्ला दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय नागरिकांना या देशामध्ये जाण्यास 2016 पासून मज्जाव करण्यात आला होता.
    First published:

    पुढील बातम्या