Home /News /videsh /

चीनला धक्का, कोरोनानंतर 2021 साठी उभं राहिलं नवं संकट

चीनला धक्का, कोरोनानंतर 2021 साठी उभं राहिलं नवं संकट

चीन (China) मधील राज्यांकडे मालकी असलेल्या अनेक कंपन्याना कर्ज भरण्यात आणि बॉण्ड देण्यास या कंपन्यांना अपयश आले आहे. या कंपन्या डिफॉल्टर (Defaulter Companies) झाल्यामुळे अनेक बँका आणि गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत.

    नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : चीनमधील (China) राज्यांकडे मालकी असलेल्या अनेक कंपन्याना कर्ज भरण्यात आणि बॉण्ड देण्यास या कंपन्यांना अपयश आले आहे. यामध्ये खाणकाम करणारी यॉन्गचेंग कोल अँड इलेक्ट्रिसिटी, चिपमेकर कंपनी शिंगुआ यूनीग्रुप आणि हुआचेन ऑटोमोटिव्ह ग्रुपसहित अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या डिफॉल्टर (Defaulter Companies) झाल्यामुळे अनेक बँका आणि गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. मंडे रिपोर्टमधील वृत्तानुसार, रिसर्च फर्म क्रेडिट साइटच्या माहितीनुसार, या संकटामुळे अन्य भागीदारांना विश्वासात घेण्यात आले आहे. सरकारचे समर्थन असल्यामुळे गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. अन्य कंपन्यांना मिळू शकतो फायदा या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने 2021 या वर्षात देखील गुंतवणूकदार चिंतेत राहणार आहेत. 2021 मध्ये देखील या कंपन्यांची परिस्थिती सुधारणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मार्केटमधील अन्य छोट्या मोठ्या कंपन्यांना फायदा होणार आहे. या कंपन्या बुडल्यामुळे गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी या लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतील. त्यामुळे या लहान कंपन्यांना फायदा होईल. या तीन कारणांमुळे निर्माण झाली समस्या पीपल्स बँक ऑफ चायनाच्या रिपोर्टनुसार या कंपन्यांना तोटा झाल्याने चीनमधील अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. यामध्ये बँकेने या कंपन्या डिफॉल्ट होण्याची तीन कारणे सांगितली आहेत. कर्ज देण्यासाठी उधारीवर अवलंबून राहणं हे पहिलं कारण सांगितले आहे. तर दुसरे कारण म्हणजे प्रशासकीय मुद्दा, जसं की कंपन्यांच्या समूहात कर्जाची मालिका आणि छुप्या आंतर-गटांचे व्यवहार करणे, तर तिसरे कारण म्हणजे विविध उद्योग आणि क्षेत्रात जलद विस्तार करणे, यामुळे कर्ज चुकवण्याची कंपनीची क्षमता कमी झाल्याने कंपन्या डिफॉल्टर होतात. 2021 मध्ये देखील आशा नाही रेटिंग एजेंसी फिचने आपल्या रिपोर्टमध्ये राज्यांकडे मालकी असलेल्या या डिफॉल्टर कंपन्यांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, अशी भीती वर्तवली आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने या कंपन्यांना निधी देण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे, त्यामुळे कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक असल्याने 2021 मध्ये देखील बँक कडक भूमिका घेईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. एजन्सीच्या माहितीनुसार, 20 खासगी कंपन्यांनी जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान आपल्या ऑनशोर बॉंडमध्ये मोठी चूक केली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या