Home /News /videsh /

उत्पन्न नसतानाही ही व्यक्ती भरतेय हजारोंचा Income Tax, कारण ऐकून व्हाल थक्क

उत्पन्न नसतानाही ही व्यक्ती भरतेय हजारोंचा Income Tax, कारण ऐकून व्हाल थक्क

एक व्यक्ती उत्पन्न नसतानाही (Having no income) गेल्या अनेक वर्षांपासून इन्कम टॅक्स (Income tax) भरत असल्याचं समोर आलं आहे.

    पॅरिस, 5 सप्टेंबर : एक व्यक्ती उत्पन्न नसतानाही (Having no income) गेल्या अनेक वर्षांपासून इन्कम टॅक्स (Income tax) भरत असल्याचं समोर आलं आहे. अऩेक वर्षं इन्कम टॅक्स भरल्यानंतर आपली चूक त्या व्यक्तीच्या लक्षात आली. त्या व्यक्तीनं आयकर विभागाकडे धाव घेत यावर काही उपाय आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत फारच उशीर झाला होता. यासाठी भरला इन्कम टॅक्स ही घटना आहे फ्रान्समधील. 83 वर्षांचे फ्रान्सिस लोपेज हे गेल्या अनेक वर्षांपासून टॅक्स भरत आहेत. मात्र प्रत्यक्षात याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावे तो टॅक्स जमा होत आहे. नावातील साधर्म्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अर्थात, एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असण्याचे प्रकार अनेक देशांत सतत घडतच असतात. मात्र फ्रान्सिस लोपेज यांचं केवळ नावच नाही, तर इतरही अनेक गोष्टीत साधर्म्य असल्याचं दिसून आलं आहे. लोपेज यांचं नाव, वय, जन्मतारीख आणि शहर हे एकसारखं आहे. त्याशिवाय दोघांचा सोशल सिक्युरिटी नंबरदेखील जवळपास एकसारखा आहे. त्यामुळे ही गोष्ट फ्रान्सिस यांच्या अनेक वर्ष लक्षात आली नव्हती. नुकतीच ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी इन्कम टॅक्स विभागाकडे याबाबत विचारणा केली. आयकर विभागाचं उत्तर आपण नाहक दुसऱ्या व्यक्तीचा आयकर भरत असल्याने ती रक्कम आता आपल्याला परत मिळू शकेल काय, अशी विचारणा फ्रान्सिस लोपेज यांनी फ्रान्सच्या इन्कम टॅक्स विभागाला केली. त्यावर इन्कम टॅक्सची प्रणाली आणि नियमदेखील आता बदलले असल्यामुळे पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्याचं उत्तर त्यांना मिळालं. हे वाचा - पुण्यातील तरुणीला आईच्या रिलेशनशीपचा लागला सुगावा;BFच्या मदतीनं उकळले लाखो रुपये फ्रान्समधील रिपोर्टनुसार गेल्या 15 वर्षांत फ्रान्सिस लोपेज यांनी 700 युरोचा टॅक्स भरला आहे. भारतीय चलनात याची किंमत होते सुमारे 60 हजार रुपये. इन्कम टॅक्सनं ही चूक सुधारली नाही, तर आपले आणखी पैसे वाया जातील, असं फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: France, Income tax

    पुढील बातम्या