S M L

सिनेटर टॅमी डकवर्थ आणि त्यांच्या तान्ह्या मुलीने सिनेटमध्ये रचला इतिहास!

टॅमी या स्वतः आधी लष्करात होत्या. इराक युद्धात त्यांचा सहभाग होत. त्यात त्यांनी आपले दोन्ही पाय गमावले. पण त्यांनी हार न मानता नव्यानं आयुष्य सुरू केलं, आणि राजकारणात आल्या.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 25, 2018 04:32 PM IST

सिनेटर टॅमी डकवर्थ आणि त्यांच्या तान्ह्या मुलीने सिनेटमध्ये रचला इतिहास!

22 एप्रिल : महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच एकीकडे महिला हक्कांबाबत जगात जागरुकता वाढत चालली आहे आणि याची दखल आता व्हाईट हाऊसलाही घ्यावी लागली आहे. इलिनॉईमधल्या डेमोक्रॅट पक्षाच्या सिनेटर टॅमी डकवर्थ या आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन थेट सिनेटमध्ये आल्या आणि सगळ्यांच्या भूवया कौतुकाने उंचावल्या.

सिनेमध्ये एका मुद्द्यावर मतदान होतं. त्यासाठी त्या आल्या होत्या. पण दरम्यान, याआधी नियम असा होता की मतदानाच्या वेळी तान्ह्या आणि लहान मुलांना आणण्यास परवानगीच नव्हती. पण महिलांची प्रत्येक क्षेत्रातली उंच भरारी पाहता व्हाईट हाऊसलाही नियम बदलावे लागले.

सिनेटर टॅमी यांच्या मुलीचं नाव माईली आहे. ९ एप्रिलला तिचा जन्म झाला. टॅमी या स्वतः आधी लष्करात होत्या. इराक युद्धात त्यांचा सहभाग होत. त्यात त्यांनी आपले दोन्ही पाय गमावले. पण त्यांनी हार न मानता नव्यानं आयुष्य सुरू केलं, आणि राजकारणात आल्या.

सिनेटमध्ये १२ दिवसांची माईली आल्यावर सर्वांनाच नवल वाटलं. कौतुकही वाटलं. मतदान करून टॅमी इवल्याश्या माईलीला घेऊन घरी परतल्या. महिलांच्या या धाडसाला आणि त्यांच्या या कतृत्ववान धैर्याला भारतातही असा मान मिळाला तर बरं होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2018 09:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close