Home /News /videsh /

कीवला घेरण्याची मोठी तयारी, 64 किमी लांबीच्या रशियन लष्करी ताफ्याचा 3D फोटो

कीवला घेरण्याची मोठी तयारी, 64 किमी लांबीच्या रशियन लष्करी ताफ्याचा 3D फोटो

रशियानं (Russia) युक्रेनची राजधानी कीवला वेढा घालण्यासाठी संपूर्ण 64 किलोमीटर (40 मैल) लांब काफिला आणला आहे.

    कीव, 04 मार्च: रशिया युक्रेन मराठी बातम्या: रशियानं (Russia) युक्रेनची राजधानी कीवला वेढा घालण्यासाठी संपूर्ण 64 किलोमीटर (40 मैल) लांब काफिला आणला आहे. लष्करी ट्रक, चिलखती वाहने आणि लष्करी उपकरणे असलेल्या या ताफ्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. सध्या तो युक्रेनमध्ये (Ukraine) दाखल झाला असला तरी कीवपर्यंत पोहोचलेला नाही. रशियाचा आतापर्यंतचा युक्रेनला पाठवण्यात आलेला हा सर्वात लांब ताफा आहे. याआधी रशियन ताफ्यांचा आकार 3 मैलपर्यंत होता. आता या काफिल्याचा थ्रीडी व्हिडिओ समोर आला आहे. मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या (Maxar Technologies) या व्हिडिओमध्ये रशियन ताफा रस्त्यावरून जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.त्याचे थ्री डी फोटोज समोर आले आहेत. आजतकनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आधी हल्ला, नंतर गोळीबार...हॉस्पिटलमधून भारतीय विद्यार्थी हरजोत मागतोय मदतीचा हात दक्षिणेतील अँटोनोव्ह विमानतळ (Antonov airport) परिसरातून हा ताफा सुरू होत असून उत्तरेकडील प्रीबिर्स्क (Prybirsk) भागात संपेल, अशी यापूर्वीची माहिती समोर आली होती. रशियन ताफ्यात शेकडो लष्करी वाहने, टाक्या, तोफखाना इ. यांचा समावेश आहे. अँटोनोव्ह विमानतळावरून हा ताफा गेला होता. हे तेच क्षेत्र आहे जिथे जगातील सर्वात मोठे विमान An-225 होते, जे रशियन क्षेपणास्त्रांनी नष्ट केलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दावा केला की, कीवच्या दिशेनं जाणारा रशियन लष्कराचा ताफा थांबला होता. त्यांनी दावा केला की, रशियन सैन्याकडे केवळ अन्नधान्यच नाही तर इंधन संपलं आहे. युद्ध सुरू होऊन आठ दिवस उलटले आहेत, मात्र अद्याप रशियाची राजधानी कीव युक्रेनच्या ताब्यात आलेली नाही. याशिवाय युक्रेननं दावा केला आहे की युद्धात त्यांनी सुमारे 9 हजार रशियन सैनिक मारले आहेत. दरम्यान रशियाच्या अधिकृत निवेदनानुसार या युद्धात त्यांचे सुमारे 500 सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनचे म्हणणे आहे की, त्यांनी 4 मार्चपर्यंत 9,166 रशियन सैनिक मारले आहेत. याशिवाय 33 विमाने, 37 हेलिकॉप्टर, 251 टँक, 105 आर्टिलरी गन, 60 इंधन टाक्या आदी नष्ट करण्यात आले. युक्रेन लष्कराकडून 3 हजार भारतीय ओलीस?, पुतीन यांचा दावा खरा की खोटा? रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियाजवळील खेरसन (Kherson) हे मोठे शहर रशियन लोकांनी आधीच काबीज केलं आहे. आता त्याची नजरही मारियुपोल (Mariupol) वर आहे. असं म्हटलं जात आहे की, कीव बरोबरच रशियाचे मुख्य लक्ष आता अणु प्रकल्प क्षेत्राकडे वळलं आहे. दरम्यान, रशियन सैन्यानं यापूर्वीच युरोपमधील सर्वात मोठा Zaporozhye अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला आहे. हे एनरहोदर (Enerhodar) शहरात आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या