Home /News /videsh /

बापरे! कोरोना व्हायरस झाला आणखी धोकादायक, आढळून आलं ‘हे’ धक्कादायक वास्तव

बापरे! कोरोना व्हायरस झाला आणखी धोकादायक, आढळून आलं ‘हे’ धक्कादायक वास्तव

औषधावर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांसाठीही हा बदल महत्त्वाचा आहे. त्यानुसार त्यांना आपल्या संशोधनात बदल करावे लागत असतात.

    न्यूयॉर्क 4 जुलै: कोरोना व्हायरस गेल्या 5 महिन्यांपासून जगभर धुमाकूळ घालत आहे. जगातले 190 पेक्षा जास्त देश कोरोनाने ग्रासले आहेत. काही लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक या व्हायरसने ग्रस्त झाले आहेत. आता पाच महिन्यानंतर हा व्हायरस आणखी धोकादायक झाला असल्याचं एका अहवालत म्हटलं आहे. अमेरिकेतल्या एका प्रतिष्ठित मासिकात याविषयी एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी या नव्या व्हायरसला G614 असंही नाव दिलं आहे. या व्हायरसमध्ये अनेक बदल होत असल्याचं आत्तापर्यंत शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. त्यातला हा बदल जास्त घातक असल्याचं त्यांना आढळून आलं आहे. हा व्हायरस अमेरिकेत आढळून आला आहे. युरोपमधून आल्यानंतर त्याच्यात हा बदल झाल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. भारतात ICMRही यावर संशोधन करत असून या बदलामुळे त्या व्हायरसचा धोका लक्षात येतो. औषधावर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांसाठीही हा बदल महत्त्वाचा आहे. त्यानुसार त्यांना आपल्या संशोधनात बदल करावे लागत असतात. कोरोनाव्हायरसची लस (coronavirus vaccine) कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला लागली आहे. मात्र बहुतेकांना कोरोना लशीची गरजच पडणार नाही, तर कोरोना हा सामान्य फ्लूप्रमाणे होईल, लोकांच्या आयुष्याचा एक भाग होईल, असा दावा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) तज्ज्ञांनी केला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारची नवी गाइडलाइन, कमी केला 'या' औषधाचा डोस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या  प्राध्यापिका आणि एपिडेमोलॉजिस्ट सुनेत्रा गुप्ता (Sunetra Gupta) यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे. COVAXIN - भारत बायोटेक बनवणार जगातील पहिली कोरोना लस? कंपनीने दिली प्रतिक्रिया सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या, "सामान्यत: निरोगी लोक, जे वृद्ध नाहीत, कमजोर नाहीत आणि त्यांना इतर कोणता आजार नाही अशा लोकांना कोरोनाव्हायरसला घाबरण्याची काहीच गरज नाही, हा फ्लूप्रमाणेच असेल. इन्फ्लूएंझापेक्षादेखील या व्हायरसमुळे कमी लोकांचा मृत्यू होईल अशी मला आशा आहे"    
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या