लंडन, 06 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा प्रार्दुभाक वाढल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याशी (Boris Johnson) सल्लामसलत केल्यानंतर ब्रिटनमध्ये लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे अंमलबजावणी करणारे वैज्ञानिक प्रोफेसर नील फर्ग्युसन आता वादात अडकले आहेत. नीलने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या विवाहित मैत्रिणीला भेटल्याचे कबूल केल्यावर त्यांनी मंगळवारी सरकारच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला. आपल्या मैत्रिणीला भेटल्यानंतर नील यांना कोरोना झालेल्या आढळून आले आहे.
प्रोफेसर नील फर्ग्युसन यांनी अनेक वेळा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन आपल्या मैत्रिणीला घरी बोलावले. आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना नील यांनी असे सांगितले की, "मी माझी चूक मान्य करतो. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मला गोष्टीचे वाईट वाटते की कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा मी संदेश देत होतो, मात्र तिच त्याकडे दुर्लक्ष केले'. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर नील फर्ग्युसन यांनी लॉकडाऊन जाहीर करावा अशी शिफारस पंतप्रधानांकडे केली होती.
वाचा-LIVE SEX पाहणं महागात पडलं, हॅकर्सनं जाळ्यात अडकवून असा घातला गंडा!
दोनवेळा लंडनला आली होती मैत्रिण
टेलीग्राफच्या वृत्तानुसार, 51 वर्षीय नील यांनी गर्लफ्रेंड अँटोनिया स्टॅट्स (वय 38,) दोन वेळा लंडन शहरात प्रोफेसरला भेटण्यासाठी आली होती. प्रोफेसर नील हे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील पथकाचे प्रमुख होते, त्यांनी ब्रिटन सरकारला सांगितले होते की जर सामाजिक अंतर आणि लॉकडाऊन लागू केले नाही तर देशात 2.5 लाखांपर्यंत मृतांची संख्या वाढेल. वृत्तानुसार, अँटोनिया 30 मार्चला प्रथम नील यांना भेटली, त्यावेळी लंडनमध्ये कडक बंदोबस्त लागू होता. यानंतर, दुसऱ्यांदा8 एप्रिल रोजी, त्या नील यांना भेटायला आल्या. दरम्यान नील यांच्या गर्लफ्रेंण्डच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात तिलाही कोरोना झाला, आता नीलही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
वाचा-लॉकडाऊनमध्ये विराटसाठी दु:खद बातमी, सगळ्यात जवळच्या 'मित्रा'चा मृत्यू
वाचा-26/11 हल्ल्यात कसाबला शिक्षा देणारे मुख्य साक्षीदार सापडले मुंबईच्या रस्त्यावर
'मी चूकलो, हिच माझी शिक्षा'
नील यांनी टेलीग्राफशी बोलताना सांगितले की, "मी चुकीचा निर्णय घेतला, मला वाटले की मी रोगप्रतिकारक आहे. कोरोना संसर्गामुळे मी सरकारच्या सल्लागार समितीपासून स्वत: ला वेगळे करतो आणि दोन आठवड्यांसाठी मी आयसोलेशनमध्ये जात आहे". दरम्यान यावेळी नील यांनी सोशल डिस्टन्सिंगचा पालन न केल्याचे परिणाम काय असतात, याचे मी स्वत: एक उदाहरण असल्याचेही सांगितले.