शास्त्रज्ञांची भीती वाढली, 'या' प्राण्यामध्ये सापडला कोरोनाशी मिळता जुळता व्हायरस

शास्त्रज्ञांची भीती वाढली, 'या' प्राण्यामध्ये सापडला कोरोनाशी मिळता जुळता व्हायरस

जागतिक आरोग्य संघटनाच्या (WHO) म्हणण्यानुसार, वघवाघुळ हे कोरोना विषाणूचे SARS-CoV वाहक असतात, परंतु मानवी शरिरात प्रवेश करण्याआधी हा विषाणू दुसर्‍या प्रजातीपर्यंत पोहोचली असावी.

  • Share this:

न्यूयॉर्क, 27 मार्च : कोरोनाने जगभरात थैमान घातले असले तरी, कोरोनाचा प्रसार कसा झाला याचे नेमके उत्तर शास्त्रज्ञांना अद्याप सापडले नाही आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर असे म्हटले जात होते की हा विषाणू वटवाघुळामुळे पसरला आहे. मात्र एक नवीन संशोधनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, वटवाघुळ नाही तर पॅंगोलिन या प्राण्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे. 26 मार्च रोजी नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात, याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोविड-19 सारखा कोरोना विषाणू एका पॅंगोलिन प्राण्यामध्ये आढळून येतो.

वटवाघूळा व्यतिरिक्त, कोरोना विषाणूच्या कुटूंबाला संसर्ग झालेला पॅंगोलिन हा एकमेव सस्तन प्राणी आहे. या अभ्यासानुसार पॅंगोलिन हे कोरोनाच्या प्रसारासाठी जबाबदार असल्याचे मानले जात आहे. मात्र असा थेट निष्कर्ष शास्त्रज्ञांना काढता आलेला नाही. मात्र शास्त्रज्ञांनी दावा आहे की, नवीन कोरोना विषाणूच्या निर्मितीमध्ये या प्राण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते.

जागतिक आरोग्य संघटनाच्या (WHO) म्हणण्यानुसार, वघवाघुळ हे कोरोना विषाणूचे SARS-CoV वाहक असतात, परंतु मानवी शरिरात प्रवेश करण्याआधी हा विषाणू दुसर्‍या प्रजातीपर्यंत पोहोचली असावी. म्हणजेच कोरोना विषाणू हा वटवाघुळाआधी एखाद्या प्राण्यापासून माणसांपर्यंत पोहोचला असावा.

पॅंगोलिन धोकादायक प्राणी

पॅंगोलिन हा एका धोकादायक, विशाल आणि मुंग्या खाणारा सस्तन प्राणी आहे जो आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशनमध्ये पॅंगोलिनच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणारे डॅन चँडलर यांनी, "पॅंगोलिन हा कोरोना विषाणूचा वाहक मानला जातो. कोरोना विषाणूचा स्रोत समजण्यासाठी प्रत्येकाचे डोळे पॅंगोलिनवर आहेत हे आश्चर्यकारक नाही. यासाठी पॅंगोलिन विक्रीवर पुर्णत: बंदी आणण्याची गरज आहे", असे सांगितले.

कोरोनाची दहशत बघा, महिला शिंकली म्हणून दुकानदारानं फेकलं 26 लाखांचं सामान

चीनमध्ये होते पॅंगोलिनची विक्री

पॅंगोलिनच्या व्यावसायिक विक्रीवर पूर्ण बंदी असली तरी चिनी औषधांसाठी दरवर्षी हजारो पॅंगोलिनची तस्करी केली जाते. चीन, व्हिएतनाम आणि आशियातील काही देशांमध्ये त्याचे मांससुद्धा खाल्ले जाते. कोरोना विषाणू हा शरीरात द्रवपदार्थ, मल आणि मांसाद्वारे सहज पसरतो. त्यामुळे खाण्यामध्ये पेंगोलिनचा वापर जास्त धोकादायक आहे. चीनमध्ये, पॅंगोलिन खाणे बेकायदेशीर आहे परंतु ते इथल्या बर्‍याच हॉटेलमध्ये याची सर्रास विक्री केली जाते.

काय सांगतो रिसर्च?

नवीन संशोधनात, पॅंगोलिनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूचे जीन्स (genes) हे सध्याच्या कोरोना विषाणूच्या जनुके (genes) संरचनेशी 88.5 टक्के ते 92.4 टक्क्यांनी जुळते असे दिसत आहे. या निष्कर्षांवरून संशोधकांनी पॅंगोलिन कोरोनाच्या प्रसाराठी कारणीभूत असतील असे म्हणता येणार नाही. मात्र शक्यता नाकारता येत नाही.

First published: March 27, 2020, 2:35 PM IST

ताज्या बातम्या