Home /News /videsh /

पृथ्वीकडे सरकणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा धूमकेतू, ताशी 35 हजार किमीचा वेग

पृथ्वीकडे सरकणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा धूमकेतू, ताशी 35 हजार किमीचा वेग

Comet Approaching Towards Earth: पृथ्वीवर आणि अंतराळात दुर्बिणीचा वापर करणारे शास्त्रज्ञ तेव्हापासून त्यावर लक्ष ठेवत आहेत. याचा प्रवास 2031 मध्ये शनि ग्रहाच्या अंतरावर संपेल. शास्त्रज्ञांना तो एक महाकाय धूमकेतू आहे हे माहीत होतं.

पुढे वाचा ...
    वॉशिंग्टन, 13 एप्रिल : आतापर्यंत दिसलेला सर्वात मोठा धूमकेतू (biggest comet) ताशी 35,405 किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. या धूमकेतूचं वस्तुमान सुमारे 500 ट्रिलियन टन आहे. त्याचं बर्फाळ केंद्रक 128 किमी रुंद आहे, हे इतर ज्ञात धूमकेतूंच्या केंद्रांपेक्षा 50 पट मोठं आहे. पण त्याची काळजी करण्याची गरज नाही, असं अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचं (NASA) म्हणणं आहे. हा धूमकेतू सूर्यापासून सुमारे 1.60 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त जवळ येणार नाही. C/2014 UN271 नावाचा धूमकेतू पहिल्यांदा एक दशकापूर्वी नोव्हेंबर 2010 मध्ये दिसला होता, असं इंडिपेंडंटनं म्हटलं आहे. त्यावेळी तो सूर्यापासून 4.82 अब्ज किलोमीटर अंतरावर होता. सूर्यमालेच्या कडेवरून त्याच्या केंद्राकडे प्रवास करत होता. त्याचं वस्तुमान सूर्याच्या जवळ आढळणाऱ्या इतर धूमकेतूंपेक्षा एक लाख पट जास्त आहे. हे वाचा - रशियन सैन्याकडून बुचामध्ये 25 मुलींना कैदेत ठेवून बलात्कार, अनेकजणी प्रेग्नंट? हबल अंतराळ दुर्बीणीने दर्शवला आकार पृथ्वीवर आणि अंतराळात दुर्बिणीचा वापर करणारे शास्त्रज्ञ तेव्हापासून त्यावर लक्ष ठेवत आहेत. याचा प्रवास 2031 मध्ये शनि ग्रहाच्या अंतरावर संपेल. तो पाहणाऱ्या शास्त्रज्ञांना तो एक महाकाय धूमकेतू आहे हे माहीत होतं. परंतु, हबल स्पेस टेलिस्कोपने (Hubble Space Telescope) घेतलेल्या छायाचित्रांवरून त्याच्या विशाल आकाराचा सर्वात अलीकडील अंदाज लावला गेला आहे. हे वाचा -मोठी बातमी : श्रीलंकेकडून दिवाळखोरीची घोषणा; देशावर आहे 51 अब्ज डॉलर्सचं कर्ज धूमकेतू शोधणं हीदेखील एक कला आहे धूमकेतूचा आकार निश्चित करणं खूप कठीण आहे, कारण, त्याच्या आजूबाजूला अनेक धुळीचे कण असतात. ज्यामुळं त्याला पाहणंही खूप कठीण असतं. पण, धूमकेतूच्या मध्यभागी असलेल्या चमकदार बिंदूकडे बारकाईने पाहिल्यानंतर आणि संगणक मॉडेल्सचा वापर करून शास्त्रज्ञांना ते सापडले. हा धूमकेतू अब्जावधी वर्षे जुना आहे आणि आपल्या सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील अवशेष आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Nasa, Science

    पुढील बातम्या