Elec-widget

चार्जिंगला लावून फोन ठेवला होता उशी खाली, स्फोटात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

चार्जिंगला लावून फोन ठेवला होता उशी खाली, स्फोटात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

एका शाळकरी मुलीची मोबाइलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला.

  • Share this:

अस्ताना, 03 ऑक्टोबर: आतापर्यंत तुम्ही फोनची बॅटरी फुटल्याचे अनेक किस्से ऐकले असतील. असंच काहीसं प्रकरण कझाकिस्तानमध्येही झालं. एका शाळकरी मुलीची मोबाइलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला. 14 वर्षांची Alua Asetkyzy Abzalbek तिचा स्मार्टफोन रात्री चार्जिंगला (phone blast while charging) लावून गाणी ऐकत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी Alua तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. तिच्या डोक्याच्या शेजारीच फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनच्या बॅटरीचा जेव्हा स्फोट झाला तेव्हा फोन चार्जिंग सॉकेटला लावलेला होता. ब्लास्टमुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखावत झाली होती. यामुळेच तिचा मृत्यू झाला.

द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फॉरेन्सिक एक्सपर्टने निश्चित केले की, जास्त चार्जिंगनंतर फोनमध्ये सकाळी ब्लास्ट झाला. याच ब्लास्टमुळे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. नेमका तो स्मार्टफोन कोणत्या ब्रॅण्डचा होता हे कळू शकलेले नाही.

आधीही झाल्या अशा घटना-

याआधी कॅलिफोर्नियामध्येही अशीच एक घटना घडली होती. 11 वर्षिय मुलीच्या Apple आयफोन 6 मध्ये आग लागल्यामुळे तिची चादर थोडीशी जळली होती. यानंतर तिने त्वरीत फोन फेकून दिला. घडलेल्या घटनेबद्दल बोलताना मुलगी म्हणाली की, ती बेडवर तिचा फोन घेऊन बसली होती, तेव्हा तिच्या आयफोनमधून आग येऊ लागली होती. आगीच्या काही ठिणग्या चादरीवर पडल्यामुळे चादरीला भोकं पडली. आयफोनची निर्मिती करणाऱ्यांच्या मते, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आयफोन फोनला आग लागू शकते. त्यांच्यामते, नकली चार्जिंग केबल किंवा चार्जरच्या वापरानेही फोनला आग लागण्याचा धोका असतो.

Loading...

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 08:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...