मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

वर्गातली मुलगी आवडते म्हणून निलंबन! दुसरीतल्या मुलीवर शाळेची कठोर कारवाई

वर्गातली मुलगी आवडते म्हणून निलंबन! दुसरीतल्या मुलीवर शाळेची कठोर कारवाई

एकीकडे जगभरात समलैंगिकते बद्दल जनजागृती होत असताना व्यक्तिस्वातंत्र्यावर भर देणाऱ्या अमेरिकेतील एका शाळेत मात्र भलताच प्रकार आढळून आला आहे.

एकीकडे जगभरात समलैंगिकते बद्दल जनजागृती होत असताना व्यक्तिस्वातंत्र्यावर भर देणाऱ्या अमेरिकेतील एका शाळेत मात्र भलताच प्रकार आढळून आला आहे.

एकीकडे जगभरात समलैंगिकते बद्दल जनजागृती होत असताना व्यक्तिस्वातंत्र्यावर भर देणाऱ्या अमेरिकेतील एका शाळेत मात्र भलताच प्रकार आढळून आला आहे.

  • Published by:  news18 desk
ओक्लाहोमा, 02 फेब्रुवारी: एकीकडे जगभरात समलैंगिकते बद्दल जनजागृती होत असताना व्यक्तिस्वातंत्र्यावर भर देणाऱ्या अमेरिकेतील एका शाळेत मात्र भलताच प्रकार आढळून आला आहे. अमेरिकेतील एका शाळेत एका आठ वर्षांच्या मुलीला केवळ तिनं आपल्या मैत्रिणीवर Crush असल्याचं सांगितल्यामुळे शाळेतून काढून टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर या शाळेनं या मुलीच्या लहान भावालाही शाळेतून काढून टाकलं आहे. हा सर्व प्रकार ओक्लाहोमा (Oklahoma) प्रांतातल्या ओवासो इथल्या रीजोईस ख्रिश्चन प्राथमिक शाळेत (Rejoice Christian School) गेल्या आठवड्यात घडला. क्लोए शेल्टन (Chloe Shelton) ह्या दुसरीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या वर्गमैत्रीणीला मैदानावर खेळत असताना तिला ती आवडत (crush) असल्याचं सांगितलं. मात्र हे कळताच शिक्षकांनी मैदानावरूनच तिला थेट प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये नेलं व तिथे तिला बसवून ठेवलं. दरम्यान, शाळेने क्लोएच्या आईला फोन करून शाळेत बोलावलं आणि तिला घरी घेऊन जाण्यास सांगत शाळेतून काढून टाकलं. क्लोएची आई डेलनी शेल्टन यांनी सीएनएन वृत्तसंस्थेशी बोलताना घडलेला सर्व प्रकार सांगितला. डेलनी शेल्टन यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की,’ मी शाळेत पोहचण्यापूर्वीच उपप्राचार्यांनी क्लोएला सांगितलं की स्त्रियांनी फक्त पुरुषांवर प्रेम करायचं असत, त्यांच्यापासूनच त्यांना मुले होऊ शकतात. हे सगळं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. उपप्राचार्यांनी तर मुलींना मुली आवडत असल्याबद्दल, मला कसे वाटते असा प्रश्नही विचारला. त्यावर  मला यात काहीच गैर दिसत नाही असं माझं मत होतं.’ त्यानंतर त्यांनी मला क्लोएला घरी घेऊन जाण्यास सांगितलं आणि शुक्रवार पासून शाळेत येऊ नकोस असे देखील सांगण्यात आलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी क्लोएच्या त्याच शाळेत शिकणाऱ्या 5 वर्षांच्या भावालाही शाळेतून काढून टाकण्यात आलं. शेल्टननं याची कारणं विचारली, तेव्हा क्लोएचे विचार, धारणा, विश्वास शाळेच्या तत्वांशी जुळत नसल्याचं सांगण्यात आलं. आणि ह्याचा बाकीच्या विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो असे देखील शाळेचं म्हणणं होतं. शेल्टन म्हणाल्या, ‘मला खूप राग आला होता.मी दुखावलीही गेले. राग, विश्वासघात झाल्याची भावना, दु:ख अशा अनेक भावनांनी माझ्या मनात गर्दी केली होती. जे घडलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी शाळेला यावर चर्चा करण्याची विनंती केली; पण यापुढे आणखी काही बोलण्याची गरज नाही, असं सांगत त्यांनी माझी मागणी सरळ धुडकावूनच लावली.’ लैंगिक अनैतिकता शाळेच्या विश्वासांविरुद्ध आहे, शाळेच्या हँडबुकमध्ये नोंद जर तुम्ही समलैंगिक किंवा उभयलिंगी असाल तर तसं सांगणं आवश्यक असल्याचं शाळेच्या हँडबुकमध्ये (School Handbook) लिहिलं आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अनैतिकतेला शाळेच्या आदर्शाविरुद्ध मानलं जातं. जे विद्यार्थी शाळेच्या सुचनांचे पालन करणार नाहीत त्यांना शाळेतून काढून टाकण्याचा पूर्ण अधिकार शाळेकडे असेल असेदेखील ह्या हँडबुकमध्ये नमूद केले आहे. शाळेतील मुला-मुलींना एकमेकांप्रती असलेलं प्रेम जाहीररीत्या दर्शवण्यास परवानगी नाही. अगदी एकमेकांशी हात मिळवणे, मिठी मारणं किंवा चुंबन घेणं याला देखील मनाई आहे.तसेच गर्भधारणादेखील शाळेतून काढून टाकण्याचं कारण ठरू शकते. अशा विद्यार्थ्यांनी घरीच राहण्याला शाळेचं प्राधान्य आहे,  जेणेकरून इतर विद्यार्थ्यांवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही, असंही शाळेच्या हँडबुकमध्ये म्हटलं आहे. हे देखील वाचा -    भयानक! अंत्यसंस्कार होणार इतक्यात मृतदेहाची हालचाल झाली आणि...; पुढे काय घडलं पाहा शेल्टन म्हणाल्या, क्लोए चार वर्षांची असताना त्यांनी जेव्हा प्री केजीसाठी प्रथम या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी शाळेचं हँडबुक नीट वाचलं नव्हतं; पण 8 वर्षांच्या एखादया मुलीला तिच्याच वयाची मैत्रीण आवडते याचा अर्थ तिला त्या मैत्रीणीबरोबर खेळताना आनंद होतो, मजा येते असाही असू शकतो. यात त्या दोघींमध्ये कुठलेही नातं किंवा संबंध स्पष्ट होत नाहीत, असंही शेल्टन यांनी स्पष्ट केलं. क्लोला संपूर्ण अमेरिकेतून शेकडो प्रोत्साहनपर पत्रे कायली होल्डन ही देखील याच शाळेची माजी विद्यार्थिनी आहे. आता खुलेआम स्वतःची उभयलिंगी म्हणून ती ओळख करून देते. 2012 मध्ये पदवी मिळेपर्यंत बालवाडी ते इयत्ता 12वीपर्यंत ती याच शाळेत होती. शाळेत असेपर्यंत आपण उभयलिंगी आहोत असं कबूल केलं किंवा तसं वर्तन केलं तर शाळेतून काढून टाकण्याची भीती असल्यानं ती आणि तिच्या मित्रमैत्रिणी गप्प राहिल्या होत्या. क्लोएच्या अनुभवाविषयी जेव्हा तिनं ऐकलं तेव्हा होल्डनच्या शाळेतील दिवसांच्या आठवणी जागृत झाल्या. यानंतर कायली होल्डननं आपला अनुभव, आपली मतं आणि क्लोएला प्रोत्साहन देण्याबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. ती वाचून कॅनडा ते लुईझियानापर्यंतच्या अनेक लोकांनी जे कधी क्लोएला भेटलेलेही नाहीत किंवा या शाळेशीही त्यांचा काही संबंध नाही त्यांनी क्लोएला पैसे, भेटवस्तू किंवा कार्ड देऊन तिला दिलासा दिला आहे. हे देखील वाचा -   OMG! याचा हात आहे की मधमाश्यांचं घर; डेअरिंगला द्यायला हवी दाद होल्डन म्हणाली, ‘आमच्याप्रमाणे तिच्याही मनात अपराधीपणाची किंवा दडपणाची भावना निर्माण होऊ नये, असे मला वाटते. आपण काहीतरी चुकीचे वागलो आहोत किंवा आपण इतरांसारखे नाही, असा विचार करूत तिनं मोठं व्हावं असं मला वाटत नाही.’ शेल्टन म्हणाल्या, ‘आतापर्यंत क्लोएला संपूर्ण अमेरिकेमधून 150 हून अधिक पत्रे आणि मेसेजेस आलेले आहेत. त्यात तिच्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं तसंच तिच्यावर या सर्व लोकांचं आणि देवाचंही प्रेम असल्याची हमी देण्यात आली आहे. आमच्यापर्यंत पोहोचलेल्या अशा अनेक लोकांमुळे क्लोएला खूप आनंद झाला असून तिला मिळालेल्या पाठबळामुळं ती आता नवीन शाळेत नव्यानं सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे.’
First published:

Tags: Love story, USA

पुढील बातम्या