मराठी बातम्या /बातम्या /विदेश /लाडक्या कुत्र्याच्या केसांपासून बनवला स्कार्फ, महिलेनं खर्च केले 18 हजार!

लाडक्या कुत्र्याच्या केसांपासून बनवला स्कार्फ, महिलेनं खर्च केले 18 हजार!

 मिशेलने आपल्या कुत्र्यांच्या फरपासून हा स्कार्फ तयार करण्यासाठी 18 हजार रुपये खर्च केले आहेत.

मिशेलने आपल्या कुत्र्यांच्या फरपासून हा स्कार्फ तयार करण्यासाठी 18 हजार रुपये खर्च केले आहेत.

मिशेलने आपल्या कुत्र्यांच्या फरपासून हा स्कार्फ तयार करण्यासाठी 18 हजार रुपये खर्च केले आहेत.

    ब्रिटन, 29 सप्टेंबर : माणसं आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांमधलं नातं वेगळंच असतं. त्याला कोणत्याही प्रकारची उपमा देता येत नाही. त्यामध्ये पाळीव प्राणी (Pet Animals) आणि त्यांच्या मालकांचे (Pet Owner) बंध इतके जुळतात, की त्यांना कायम एकमेकांसोबत राहायचं असतं. याच संदर्भात सध्या एका ब्रिटिश महिलेचा (British Woman) किस्सा व्हायरल होते आहे. मिशेल पार्कर असं त्या महिलेचं नाव आहे. त्या महिलेने आपल्या दोन सुंदर पाळीव कुत्र्यांच्या फरच्या (Pet Dog Fur) साह्याने स्वतःसाठी एक स्कार्फ (Special Scarf) तयार केला आहे. त्या कुत्र्यांची आठवण कायम आपल्यासोबत राहावी, हे त्यामागचं कारण आहे.

    54 वर्षं वयाच्या मिशेल पार्करकडे (Michelle Parker) लुका आणि 12 वर्षांचा केशोंड केश या नावाचा असे दोन पाळीव कुत्रे आहेत. या दोन्ही कुत्र्यांची फर गोळा करून या महिलेने स्वतःसाठी पांढऱ्या रंगाचा स्कार्फ विणून घेतला आहे. त्या कुत्र्यांची आठवण आपल्यासोबत कायम राहावी, असं तिला वाटतं. म्हणून तिने या कुत्र्यांच्या फरचा वापर करून हा स्कार्फ विणून घेतला आहे. हा स्कार्फ तयार करण्यासाठी तिला भरपूर खर्चही आला आहे.

    Success Story: 100 वेळा अपयशी होऊनही मानली नाही हार; जिद्दीनं झाली अब्जाधीश

    या दोन्ही कुत्र्यांची फर खूप जास्त प्रमाणात असून, ती चांगल्या दर्जाची आहे. या फरचा वापर करून स्कार्फ तयार करण्याची कल्पना जेव्हा त्यांच्या मनात आली, तेव्हा त्यांनी लुका या कुत्र्याचे 425 ग्रॅम वजनाचे केस गोळा केले. तसंच केशोंड कुत्र्याचे 198 ग्रॅम वजनाचे केस गोळा केले. लुकाच्या फरपासून पाच फुटांचा स्कार्फ विणून घेण्यात आला. तसंच, त्यातल्या पॉम-पॉम्स तयार करण्यासाठी केशोंडच्या फरचा वापर करण्यात आला. फेसबुकवर अशाच प्रकारचं काही तरी पाहून त्यांच्या मनात अशा प्रकारच्या स्कार्फची निर्मिती करण्याची कल्पना आली होती. अँड्रिया डिव्हाइन या स्पेशालिस्टशी त्यांनी या स्कार्फच्या निर्मितीसाठी संपर्क साधला. केवळ कुत्र्यांच्या फरच्या साह्याने आणि त्यात अन्य कोणतीही लोकर न मिसळता अँड्रिया हा स्कार्फ विणू शकेल, याचा मिशेल यांना विश्वास होता. तो विश्वास अँड्रियाने सार्थ ठरवला.

    उदित नारायणही करीना कपूरच्या फ्रेंड्स गँगमध्ये? पार्टीचा फोटो पाहून सर्वजण शॉक

    मिशेलने आपल्या कुत्र्यांच्या फरपासून हा स्कार्फ तयार करण्यासाठी 18 हजार रुपये खर्च केले आहेत. तेव्हा कुठे हा वैशिष्ट्यपूर्ण स्कार्फ तयार होऊ शकला. पाच फुटांचा हा स्कार्फ त्यांनी आतापर्यंत निवडक स्थळी किंवा विशेष, कार्यक्रमाला जातानाच परिधान केला आहे. गेल्या वर्षी ख्रिसमसला त्यांनी हा स्कार्फ परिधान केल्याची आठवण त्या सांगतात. आपल्या दोन्ही कुत्र्यांचा त्यांना अभिमान आहे. 'मिरर'शी बोलताना त्यांनी सांगितलं, की त्यांचे कुत्रे खूपच बुद्धिमान आहेत. त्या दोन्ही कुत्र्यांना एकटं राहायला आवडत नाही.'

    First published:
    top videos