इम्रान खान यांची नाचक्की, सौदीच्या राजपुत्राने दिलेलं शाही विमान घेतलं काढून

इम्रान खान यांची नाचक्की, सौदीच्या राजपुत्राने दिलेलं शाही विमान घेतलं काढून

इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिलेलं भाषण हे सौदीच्या राजपुत्रांच्या नाराजीचं कारण आहे. इम्रान खान यांनी इराणशी मैत्री करण्याचं आवाहन या भाषणात केलं होतं. त्यामुळे प्रिन्स सलमान नाराज झाले.

  • Share this:

इस्लामाबाद, 7 ऑक्टोबर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सौदीच्या राजपुत्रांचं विमान घेऊन अमेरिकेला गेले होते. यावर इम्रान खान आणि प्रिन्स सलमान यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली. पण परतीच्या मार्गावर असताना हे शाही विमान बिघडलं आणि इम्रान खान यांना दुसऱ्या विमानाने यावं लागलं, अशी बातमी होती.

आता मात्र याबदद्ल वेगळीच माहिती समोर येतेय. हे विमान बिघडलेलं नव्हतंच तर इम्रान खान यांच्यावर नाराज होऊन सौदीच्या राजपुत्रांनी ते परत बोलवलं होतं. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिलेलं भाषण हे सौदीच्या राजपुत्रांच्या नाराजीचं कारण आहे. इम्रान खान यांनी इराणशी मैत्री करण्याचं आवाहन या भाषणात केलं होतं. त्यामुळे प्रिन्स सलमान नाराज झाले.पाकिस्तानी सरकारने मात्र या बातमीचा इन्कार केला आहे.

(हेही वाचा : देशातले हे हायवे बनणार रन वे, हवाई दल करतंय युद्धाचा सराव)

पाकिस्तानची अर्थव्यवस्था इतकी संकटात आहे की इम्रान खान यांना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी जायला विमान उधार घ्यावं लागलं. त्यांनी सौदीच्या युवराजांकडे दोन दिवस मुक्कामही केला. त्यांनी सौदीच्या युवराजांना काश्मीरबद्दलचा आपला उद्देश सांगितला. त्यानंतर प्रिन्स सलमान यांनी त्यांना स्वत:चं शाही विमान दिलं.

प्रिन्स सलमान यांचं बोइंग 747 - 400 हे विमान जगातल्या सर्वात महागड्या विमानांपैकी एक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचं विमानही यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळेच या शाही विमानाचा एवढा बोलबाला आहे.

======================================================================================

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

First published: October 7, 2019, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading