सौदी अरेबियाने चक्क महिला रोबोटला नागरिकत्व दिलं !

सौदी अरेबियाने चक्क महिला रोबोटला नागरिकत्व दिलं !

महिलाविरोधी कायद्यांसाठी बदनाम असलेल्या सौदी अरेबियाने चक्क एका महिला रोबोटला नागरिकत्व दिलंय. हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिच्यासारखी ही सोफिया रोबोट दिसते. एका यंत्र मानवाला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया हा जगातला पहिलाच देश ठरलाय.

  • Share this:

रियाद, 27 ऑक्टोबर : महिलाविरोधी कायद्यांसाठी बदनाम असलेल्या सौदी अरेबियाने चक्क एका महिला रोबोटला नागरिकत्व दिलंय. हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिच्यासारखी ही सोफिया रोबोट दिसते. एका यंत्र मानवाला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया हा जगातला पहिलाच देश ठरलाय. सौदीची राजधानी रियाद मध्ये फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या व्यासपीठावर हा रोबोट नागरिकत्वाचा सोहळा पार पडला.

हैनसन हांगकांग यांनी ही महिला रोबोट बनवलीय. तिला मानवाप्रमाणेच दु:ख आणि आनंदाच्या भावना व्यक्त करता येतात. सौदी अरेबियाचं नागरिकत्व मिळाल्याबद्दल तिने आंनद व्यक्त केलाय. इतिहासात एखाद्या रोबोटला पहिल्यादांच अशा प्रकारे नागरिकत्व बहाल केल्याबद्दल मी या देशाचे आभार मानते आणि हा ऐतिहासिक क्षण माझ्यासाठी अतिशय सन्मानजनक असल्याचं रोबोट सोफियानं म्हटलंय. यावेळी तिने यत्रंमानव हा माणसांसाठी धोका आहे का ? या चर्चासत्रातही सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, सौदी अरेबियाच्या या निर्णयावर टीकाही होतेय, रोबोटला नागरिकत्व देण्यापेक्षा सौदी अरेबियाने सर्वात आधी महिलांना सापत्नभावाची वागणूक देणं थांबवावं, अशी टीका काही संघटनांनी केलीय.

पाहा व्हिडिओ-

First published: October 27, 2017, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading