S M L

सौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली

सौदी अरेबियातल्या महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सौदी महिलांना गाडी चालवण्याचा हक्क देणाऱ्या कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झालीये.

Sonali Deshpande | Updated On: Jun 24, 2018 10:58 AM IST

सौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली

जेद्दा, 24 जून : सौदी अरेबियातल्या महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सौदी महिलांना गाडी चालवण्याचा हक्क देणाऱ्या कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झालीये.

हेही वाचा

रखडलेल्या पावसाचं दमदार कमबॅक!FIFA World Cup 2018 : टोनी क्रूसच्या गोलच्या बळावर जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय

रणबीर कपूर 2020मध्ये आलियाशी लग्न करणार? पहा त्याचं उत्तर

चारचाकी गाडीचा शोध लागून शतकाहून अधिक काळ झाला. पण सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवण्यास बंदी होती. काही महिन्यांपूर्वी सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी कायद्यात बदल करणार असल्याचं जाहीर केलं. सौदीची अर्थव्यवस्था वाढवायची असेल, तर अधिकाधिक महिलांनी नोकरी करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी त्यांना ड्रायव्हिंग अनिवार्य आहे. हाच विचार करून बिन सलमान यांनी कायद्यात मोठी सुधारणा केली.

Loading...
Loading...

सौदी सरकारनं गेल्या 4 जूनला 10 महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं होतं. यांचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाले होते.

सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची का परवानगी नव्हती?

सौदीमध्ये सुन्नी मुस्लिम जास्त राहतात. ते पारंपरिक आहेत. तिथल्या कायद्याप्रमाणे महिला पती, भाऊ, पिता किंवा मुलगा यांनाच सोबत घेऊन बाहेर पडू शकतात. एकट्या नाही. मग अशा देशात महिला स्वत: कार चालवणं फार दूरची गोष्ट.

सौदीचे राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांना देशाची छबी बदलायचीय. म्हणून बरेच कायदे बदलले जातायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 10:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close