कोरोनाच्या एका रुग्णानं संपूर्ण देशाला भरली धडकी, तब्बल 3 कोटी लोकं क्वारंटाइन

कोरोनाच्या एका रुग्णानं संपूर्ण देशाला भरली धडकी, तब्बल 3 कोटी लोकं क्वारंटाइन

एक असा देश ज्याने एका कोरोना रुग्णाच्या भीतीने संपूर्ण शहराला क्वारंटाइन केले आहे.

  • Share this:

रियाध, 08 एप्रिल : कोरोनामुळे संपूर्ण जगात थैमान घातले आहे. प्रत्येक क्षणाला मृतांच्या आणि रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या 14 लाख 30 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 82 हजारहून अधिक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण जग जणू लॉकडाउन झालं आहे. पण एक असा देश ज्याने एका कोरोना रुग्णाच्या भीतीने संपूर्ण शहराला क्वारंटाइन केले आहे. ते शहर आहे सौदी अरेबिया.

सौदी अरेबियामध्ये 2795 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 41 जणांचा मृत्यू झाला आहे. या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतरच त्यांनी संपूर्ण शहराला लॉकडाउन केले होते. मात्र लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. परिणामी कोरोना देशभर पसरला. त्यामुळे जवळजवळ 3 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाने सर्व जनतेला क्वारंटाइन केले आहे.

वाचा-COVID-19 : इटली भारताचा भविष्यकाळ? मुक्त बर्वेने शेअर केला थरकाप उडवणारा VIDEO

केवळ वैद्यकिय कर्मचारी आणि पोलीसांना मुभा देण्यात आली आहे. सौदीच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाची स्थिती पाहता, येत्या काळात 2 लाख लोकांना कोरोना होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळं लोकांना नियमाचे पालन करण्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. सौदी अरेबियाने आपली सर्व प्रवासी उड्डाणे रद्द केली आहेत. देशातील सर्व व्यवसाय उपक्रम बंद आहेत.

वाचा-24 तासांत ट्रम्प यांनी बदलला सूर, आधी दिली धमकी आता मोदींचं कौतुक

सर्व प्रमुख शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. देशाची राजधानी असलेल्या रियाधमध्येही लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री तौफिक अल-रबिया यांनी या परिस्थितीबाबत सांगताना, "आज आपण निर्णायक वळणावर उभे आहोत. समाज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. हा विषाणू टाळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत", असे आवाहन जनतेला केले.

वाचा-मृत्यूचं केंद्र बनतंय 'हे' गजबजलेलं शहर, 24 तासांत 731 लोकांचा मृत्यू

4 महिने तरी द्यावा लागेल लढा

तौफिक यांनी लोकांना सूचना दिली की, आताही लोकांना हा आजार समजत नाही. सौदी अरेबियामधील केवळ 50 टक्के लोक सरकारच्या आवाहानाला गांभीर्याने घेत आहेत. वेळीच सर्वसाधारण सभा घेणे थांबवा. रस्त्यावर जाणे थांबविणे आवश्यक आहे. सौदी अरेबियाच्या आताच्या परिस्थितीनुसार सरकारला कोरोना विषाणूशी लढायला आणि पराभूत करण्यास सुमारे 4 महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकेल, असा इशाराही तौफिक यांनी दिला आहे.

First published: April 8, 2020, 11:29 AM IST

ताज्या बातम्या