मुंबई, 14 जानेवारी : काही दिवसांपूर्वी आपण बाॅलिवूडची शाही लग्न पाहिली. दोन पद्धतीनं केलेली लग्न, तीन तीन रिसेप्शन्स अशी पद्धतीनं लग्न करून अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. काही वर्षापूर्वी सौदी अरेबियात अशीच शाही लग्न व्हायची. पण आता तिथल्या पद्धती बदलल्यात.
न्यूज 18नुसार बसील अल्बानी यांच्यासारखे सौदी अरबचे शाही लोक परंपरा, सामाजिक दबाव यांना बाजूला ठेवून आपल्या घरातच लग्न केलं. अगदी जवळच्या लोकांना आमंत्रण होतं.
26 वर्षाच्या विमा कर्मचाऱ्यानं लग्न केलं. त्यांनीही घरातच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नात पारंपरिक डिश भात आणि मटणाचा पदार्थ कबासा ठेवला होता. सौदी अरबच्या दृष्टीनं हे लग्न खूपच साधं होतं.
सोन्याची दागिन्यांनी मढलेला नवऱ्यामुलाचा भाऊ अल्बानी म्हणाला, 'आमच्या इथे लग्नाच्या नावानं लोक वेडे होतात. एका रात्रीत लाखो रुपये खर्च केले जातात. आम्ही साधेपणानं लग्न करायचं ठरवलं.'
जगातले श्रीमंत सौदी अरेबियात राहतात. पण सध्या तिथे सबसिडीमध्ये होणारी कपात, मोठ्या प्रमाणात असणारी बेरोजगारी, त्यात नवीन व्हॅल्यू अॅडेड टॅक्स यामुळे सौदी अरेबियातल्या लोकांची कमाई कमी झालीय. तज्ज्ञांच्या मते इथल्या लोकांच्या राहणीमानात फरक पडलाय. ते कमी झालंय.
कधी काळी टॅक्स फ्री राहिलेल्या या देशात तरुणांमधली बेरोजगारी हे प्रिंस मोहम्मद बिन सलमानपुढे एक मोठं आव्हान आहे. सौदी अरेबियातलं लग्नाचं मार्केटही डाऊन झालंय.
गेल्या वर्षापर्यंत अरब देशातल्या लग्नांचा खर्च दोन अरब रियाल (533 मिलियन डॉलर, 466 मिलियन युरो)पेक्षा जास्त व्हायचा. आता लग्नाचा खर्च 25 टक्क्यांपेक्षा कमी झालाय. एका आमंत्रण पत्रिका विक्रेत्यानं म्हटलं, आमचा व्यवसाय 70 टक्के कमी झालाय. लोक स्वस्तात महागडी डिझाईन्सची मागणी करतात.
तरीही सौदी अरेबियात अनेक परिवार सामाजिक दबावामुळे लग्नावर प्रचंड खर्च करतायत. त्यात गरीब कुटुंबाची संख्या मोठी आहे. उलट अरब परिवार शाही लग्नाची कल्पना ड्राॅप करून साध्या पद्धतीनं लग्न करतात.
VIDEO: मनसेचा राडा, कोस्टल रोडचं काम पाडलं बंद