इमरान खान यांना मोठा झटका, ‘या’ देशाने लाखो पाकिस्तानी नागरिकांना हाकललं

इमरान खान यांना मोठा झटका, ‘या’ देशाने लाखो पाकिस्तानी नागरिकांना हाकललं

पाकिस्तानची परिस्थिती, अस्वस्थता, महागाई, चलनवाढ आणि पैशाच्या परिस्थितीत क्वचितच सुधारणा होईल.

  • Share this:

रियाध, 01 फेब्रुवारी : आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पाकिस्तानची परिस्थिती, अस्वस्थता, महागाई, चलनवाढ आणि पैशाच्या परिस्थितीत क्वचितच सुधारणा होईल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मुस्लिम देशांनी स्वतःच पाकिस्तानपासून दूर जात आहेत. सौदी अरेबियाने गेल्या काही वर्षांत कोट्यवधी पाकिस्तानी लोकांना त्यांच्या देशातून हाकलून लावले.

पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी लोकसभेत सऊदी अरेबियाने गेल्या पाच वर्षात अवैधरित्या पाकमध्ये राहणाऱ्या जवळ जवळ 2 लाख 85 हजार 980 पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढले आहे. कुरैशी यांनी सांगितले की, या 2 लाख नागरिकांपैकी 61 हजार 076 लोकांना रियादला पाठवण्यात आले आहे. तर, 2 लाख 24 हजार नागरिक पुन्हा पाकिस्तानला परतणार आहेत.

वाचा-भीषण अपघातात एकुलता एक मुलगा गमावला, मुंबई-गोवा महामार्गावर मृत्यूचं सत्र सुरूच

वाचा-विराट कोहलीला टक्कर देतेय उर्वशी रौतेला, जिममधील हा VIDEO पाहून व्हाल हैराण

एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने दिलल्या माहितीनुसार 2 लाख 85 हजार 980 पाकिस्तानी नागरिकांना 2015 आणि 2019 दरम्यान रियाद आणि जेद्दाला पाठवण्यात आले होते.

वाचा-Railway Budget 2020: तेजस सारख्या नव्या 150 खाजगी ट्रेन्स, सरकारची घोषणा

मुख्य म्हणजे, पाकच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या कापसाचे उत्पादन खूप कमी झाले आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षात कापसाच्या उत्पादनात विक्रमी घट झाली आहे. कापसाच्या बियाण्याकडे योग्य लक्ष न दिल्याने हे घडले आहे. इम्रान खान सरकारचे लक्ष या गोष्टीवर केंद्रित होते की कापूस निर्यातीमुळे विदेशी चलन मिळते आणि यामुळे IMFला त्याचे कर्ज फेडण्यास मदत होईल.

वाचा-सावधान! चिकन खाताय की 'कौआ बिर्याणी'?

First published: February 1, 2020, 4:42 PM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या